शराब नहीं, दूध पियेंगे | मरीज नहीं , सशक्त बनेंगे,”||
नवे विचार,नवी संकल्पना घेऊन सुमारे २५ वर्षांपूर्वी नशामुक्त समाज निर्मितीसाठी स्व. प्रतापराव देशमुख यांनी

“शराब नहीं, दूध पियेंगे | मरीज नहीं , सशक्त बनेंगे,”||
प्रा दिलीप नाईकवाड बुलढाणा
नवे विचार,नवी संकल्पना घेऊन सुमारे २५ वर्षांपूर्वी नशामुक्त समाज निर्मितीसाठी स्व. प्रतापराव देशमुख यांनी सुरू केलेल्या ह्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाने आज २५ व्या रजत वर्षात पदार्पण करून युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी दूध वितरण करण्यात येऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले.सरत्या वर्षाला निरोप देतांना अनेक ठिकाणी युवक वर्ग नशायुक्त पदार्थांचे सेवन करण्याची कल्पना करीत असतांना २५ वर्षांपूर्वी स्व. प्रतापराव देशमुख यांच्या संकल्पनेतून सुगंधी दूध पाजून युवकांना व्यसनापासून दूर करण्यासाठी छोटासा प्रयत्न केला होता. व्यसनमुक्ती व सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी सुरू असलेला हा प्रयत्न आज त्यांच्या अकाली मृत्यू नंतरही कनिष्ठ बंधू प्रल्हाद देशमुख यांनी सातत्याने सुरू ठेवला आहे.आज ता.३१ डिसेंबर रोजी तालुक्यातील मौजे मलकापूर पांग्रा येथे २०२५ वर्षाला निरोप देतांना युवक तथा नागरिकांना अनेक गणमान्य मान्यवरांच्या उपस्थितीत केशर युक्त सुगंधी दूध पिण्यास देऊन नशाविरहित सशक्त समाज निर्मितीसाठी पुढे पाऊल टाकले.जिल्ह्यात असा एकमेव प्रयत्न असावा.वारकरी संप्रदायाचे ह.भ.प.वाघ गुरूजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला सरपंच यादव टाले, प्रतिष्ठित नागरिक गुलशेरखॉं खांसाब,तंटामुक्ती अध्यक्ष आरीफ मलिक,
डॉ.आशिष दाभेरे , शिवसेनेचे युवा नेते गजेंद्र देशमुख,डॉ.सुरेश डोडीया, डॉ.बोडखे,डॉ.टाले, डॉ.वाघ,सर्पमित्र वनिता बोराडे, ठाणेदार गजानन करेवाड ,माजी सरपंच साबिरखा पठाण,
प्रा.दिलीपनाईकवाड , तंटामुक्ती अध्यक्ष महमूदयारखां, अ.भा.पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे, अकील ठेकेदार,अशोक इंगळे,सचिन खंदारे, प्राचार्य डी.एन.पंचाळ आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
“शराब नही ,दूध पियेंगे | मरीज नही ,सशक्त बनेंगे”||,
या टॅग लाईन खाली स्व. प्रतापराव देशमुख आणि सहकारी यांनी ३१ डिसेंबर २००० रोजी व्यसनाकडे आकर्षित होणाऱ्या युवकांना व्यसनापासून दूर करण्यासाठी व्यसनमुक्त व सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी केशर युक्त सुगंधी दूध वाटपाची संकल्पना मांडली असता मित्र परिवारांनी ती उचलून धरली.त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
आज २५ वर्षे सातत्याने हा कार्यक्रम सुरू असून नशामुक्त व सशक्त समाज निर्मितीसाठीच्या कार्यक्रमात आज या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत यावर्षी समाजासाठी अतुलनीय काम करणाऱ्या गावातील पाच व्यक्तींना शाल, श्रीफळ,हार व स्मृती चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
या समाजोपयोगी उपक्रमाचे जनक स्व. प्रतापराव देशमुख यांच्या अकाली निधनानंतरही कनिष्ठ बंधू प्रल्हाद देशमुख व त्यांच्या मित्रमंडळींनी सुरू केलेल्या या अद्वितीय उपक्रमाला त्यांच्या विचार जोपासण्याचे काम सुरूच ठेवले असून शराब नही दूध पियेंगे मरीज नही सशक्त बनायेंगे या कार्यक्रमाला दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.याच उपक्रमांला जोडून यावर्षी गाव पातळीवरील सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय तथा शेती क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या गावातीलच पाच जणांचा यावेळी स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यात वैद्यकीय क्षेत्रातील कपड्याला खिसा नसलेले वैद्यकीय अधिकारी म्हणून परिचित असलेले डॉ. चंद्रकांत दाभेरे यांनी वैद्यकीय क्षेत्रात तब्बल 34 वर्ष सेवा देत गाव तथा परिसरातील नागरिकांची सेवा केली.त्यांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला. गावातील जातीय सलोखा अबाधित राहण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणाऱ्या पत्रकार फकीरा पठाण यांना जातीय सलोखा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. गावातीलच डॉ गंगाराम उबाळे यांनी मलकापूर पांग्रा येथून एक नवीन साप्ताहिक सुरू करून गावाची मुहूर्त मेढ रोवली. त्यांच गुणगौरव करून स्मृती चिन्ह देण्यात आल. गावातील प्रगतशील शेतकरी तुकाराम पंखूले व शैक्षणिक क्षेत्रातून शिक्षक तुकाराम डिघोळे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी किशोर मिसाळ, भागवत देशमुख, परमेश्वर दानवे ,रफिक मास्टर ,उद्धव देशमुख, अंकुश देशमुख, शरद साळवे, उदावंत भाऊ, अँड लुकमान शेख,एड्. वसीम शेख,अँड गावंडे ,सुनील उगले, जावेद शेख,आयुब बाबा, शरद आटोळे ,प्रवीण देशमुख,अमोल देशमुख, पवन दाभेरे,गायकवाडसर बीट जमादार निवृत्ती पोफळे तथा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोरे सर यांनी सूत्रसंचालन केले.या आधुनिक उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.
फोटो-साखरखेर्डा परिसरातील मलकापूर पांग्रा येथे युवकांना दूध पाजून सरत्या वर्षाला निरोप देतांना,उपस्थित नागरिक व मान्यवर.



