महाराष्ट्रयुवाराजकीयराजनीतिसिंदखेड राजा

सिंदखेडराजा संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी‌‌ विजय देशमुख यांची नियुक्ती

संभाजी ब्रिगेड ताकतीने वाढवण्याचा विश्वास - जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील

सिंदखेडराजा संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी‌‌ विजय देशमुख यांची नियुक्ती

संभाजी ब्रिगेड ताकतीने वाढवण्याचा विश्वास – जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील

           प्रा दिलीप नाईकवाड बुलढाणा 

जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टीवर संभाजी ब्रिगेड अध्यक्ष मनोजदादा आखरे तसेच मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष विजयकुमार घोगरे साहेब नवनाथजी घाडगे ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुन तनपुरे सर, संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक योगेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील यांच्या हस्ते विजय देशमुख यांची सिंदखेड राजा संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्षपदी विजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी सिंदखेड राजा तालुक्यात गाव गाव फिरून संभाजी ब्रिगेड मध्ये तरुणांची मोठी फळी जोडण्याचा निर्धार करण्यात आला.त्यामध्ये नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विजय देशमुख यांच्या साथीला सिंदखेडराजा तालुक्यातील दैनिक सांजशक्तीचे जिल्हा प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप नाईकवाड यांचीही मराठा सेवा संघाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आल्यामुळे भक्कम पाठबळ लाभले.यावेळी जिल्हाध्यक्ष पाटील यांनी नवनियुक्त तालुकाध्यक्ष देशमुख यांचे अभिनंदन करताना सबंध तालुक्यात ताकतीने संभाजी ब्रिगेड बांधण्यावर भर देण्याचे मत व्यक्त केले.तसेच यासाठी कुठलेही पाठबळ लागल्यास माझ्यासहित संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ व जिजाऊसृष्टीचे वरिष्ठ ताकतीने आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास नवनियुक्त तालुकाध्यक्षांना दिला. पत्रकार विजय देशमुख यांच्या नियुक्ती बाबत तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन, व स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!