क्रीडाखेलखेळमहाराष्ट्रयुवावाशिमविदर्भशाळे कॉलेज

जिल्हा परिषद वाशिम जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात कारंजा टीमचा दबदबा

छावा’ थीमवरील समूह नृत्याला प्रथम क्रमांक, विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हा परिषद वाशिम जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात कारंजा टीमचा दबदबा

          वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे

‘छावा’ थीमवरील समूह नृत्याला प्रथम क्रमांक, विभागीय स्पर्धेसाठी निवड

वाशिम जिल्हा परिषद वाशिम अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवात कारंजा तालुक्याच्या टीमने सांस्कृतिक कार्यक्रमात उल्लेखनीय यश संपादन केले. कारंजा टीमने ‘छावा’ या ऐतिहासिक व प्रेरणादायी थीमवर आधारित समूह नृत्य सादर करून प्रथम क्रमांक पटकावला असून, बुलढाणा येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या समूह नृत्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, स्वराज्यनिष्ठेची व मावळ्यांच्या बलिदानाची प्रभावी मांडणी करण्यात आली. नृत्याची संकल्पना, तालबद्ध हालचाली, भावपूर्ण अभिनय व देशभक्तीपर संदेश यामुळे उपस्थित प्रेक्षक व परीक्षक मंत्रमुग्ध झाले. सादरीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर टाळ्यांचा कडकडाट होत असून कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कारंजा टीमच्या या यशामागे कारंजा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. माने साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली टीमने सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध नियोजन व एकजुटीने मेहनत घेतल्याचे या यशातून स्पष्ट झाले. श्री. माने साहेब यांनी टीममधील प्रत्येक सदस्याला प्रोत्साहन देत आत्मविश्वास वाढवला.

या यशाबद्दल जिल्हा परिषद वाशिमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कारंजा टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सांस्कृतिक परंपरेचे जतन करताना नव्या पिढीमध्ये इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम या समूह नृत्यातून झाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

कारंजा टीमचे सर्व सदस्य,

मार्गदर्शक श्री. माने साहेब यांचे हार्दिक अभिनंदन तसेच बुलढाणा येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!