अवैद्य धंदेएटापल्लीक्राइमगडचिरोलीदारू गुटखा जुगारपोलीसमहाराष्ट्रविदर्भसोशल मीडिया

एटापल्लीमध्ये सुगंधित तंबाखू तस्करीचा पर्दाफाश

२५ हजारांचा मुद्देमाल जप्त; ‘मोठा व्यापारी’ रडारवर

एटापल्लीमध्ये सुगंधित तंबाखू तस्करीचा पर्दाफाश

२५ हजारांचा मुद्देमाल जप्त; ‘मोठा व्यापारी’ रडारवर

       जिल्हा प्रतिनिधी : तेजेश गुज्जलवार

एटापल्ली – शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या सुगंधित तंबाखू तस्करीवर अखेर एटापल्ली पोलिसांनी जोरदार घाव घातला आहे. दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी अंडा चौक परिसरात करण्यात आलेल्या धडक कारवाईत पोलिसांनी सुमारे २५ हजार रुपये किमतीचा ‘मजा’ सुगंधित तंबाखू जप्त करत तस्करीचा पर्दाफाश केला.

छत्तीसगड येथून एटापल्लीकडे मोठ्या प्रमाणावर सुगंधित तंबाखू बेकायदेशीररीत्या आणला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. संशयित मोटारसायकल क्रमांक CG 19 T 8317 चा पाठलाग करत अंडा चौक परिसरात वाहन अडविण्यात आले.

तपासादरम्यान रमेश हिरा व देवव्रत सिकदर हे दोघे सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करत असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे हा तंबाखू एटापल्लीतील एका ‘मोठ्या व्यापाऱ्याला’ पोहोचविण्यात येणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत असून, यामुळे या प्रकरणाला वेगळेच गंभीर वळण लागले आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. चंद्रशेखर शेकुर्तिवार यांनी प्रसंगावधान राखत पाठलाग करून मुद्देमाल व वाहन जप्त केले. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास API मोतीराम जी. मडावी करत असून, या तस्करीमागील खरे सूत्रधार कोण? याचा कसून शोध घेतला जात आहे.

एटापल्ली परिसरात अवैध सुगंधित तंबाखू विक्रीवर झालेल्या या कारवाईमुळे तस्करांच्या गोटात खळबळ उडाली असून, आगामी काळात आणखी धक्कादायक नावे उजेडात येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांची ही धडक कारवाई सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!