अवैद्य धंदेक्राइमपोलीसमहाराष्ट्रवाशिमविदर्भसामाजिक कार्यकर्ते

वाशिम पोलिसांची धडक कारवाई : देशी बनावटीची पिस्तूल व जिवंत काडतुसांसह एक जण जेरबंद

वाशिम जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी आळा घालण्यासाठी वाशिम पोलिसांकडून गेल्या काही वर्षांपासून

वाशिम पोलिसांची धडक कारवाई : देशी बनावटीची पिस्तूल व जिवंत काडतुसांसह एक जण जेरबंद

        वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे

वाशिम जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी आळा घालण्यासाठी वाशिम पोलिसांकडून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने धडक मोहिमा राबविण्यात येत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या, तसेच समाजात दहशतीचे वातावरण पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे धोरण पोलिस प्रशासनाने अवलंबले आहे. विशेषतः काही इसम सोशल मीडियावर शस्त्रांसह फोटो व व्हिडिओ टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याने सायबर शाखा व स्थानिक पोलिस स्टेशनमार्फत अशा व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

 

याच पार्श्वभूमीवर दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पंचशील नगर, वाशिम परिसरातील एक इसम बेकायदेशीररीत्या देशी बनावटीची पिस्तूल बाळगून सार्वजनिक ठिकाणी वावरत आहे. सदर माहिती गंभीर स्वरूपाची असल्याने पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ विशेष पथक तयार करण्यात आले व संबंधित परिसरात सापळा रचून शोधमोहीम सुरू करण्यात आली.

दरम्यान पंचशील नगर परिसरात शोध घेत असताना जागमाता परिसरात संशयित इसम असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने तात्काळ त्या दिशेने हालचाल करून महादेव मंदिर परिसरात घेराव घातला. पोलिस पथक जवळ येत असल्याचे लक्षात येताच संशयित इसम पळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!