माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते क्रिकेट मैदानाच्या कामाचा शुभारंभ
येवला दि. २१ मार्च :क्रिकेट हा केवळ खेळ नसून शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करणारे प्रभावी माध्यम आहे.

माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते क्रिकेट मैदानाच्या कामाचा शुभारंभ

नाशिक येवला प्रतिनिधी प्रविण पाटील
=======================
येवला दि. २१ मार्च :क्रिकेट हा केवळ खेळ नसून शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करणारे प्रभावी माध्यम आहे. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना आपल्या क्रीडा कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळते. भुजबळ ब्रिगेडचा हा उपक्रम कौतुकास्पद असून, यामुळे येवल्यातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट होईल, असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.
गोशाळा मैदान, येवला येथे भुजबळ ब्रिगेड आयोजित येवला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या महा-रणसंग्राम निमित्त मैदानाचे पूजन करून कामाचा शुभारंभ समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी मैदान व संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली.
कार्यक्रमास नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, शहराध्यक्ष दत्ता निकम, गटनेते दिपक लोणारी, नगरसेवक प्रवीण बनकर, गोटू मांजरे, गणेश गायकवाड, नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, मकरंद सोनवणे, दिपक गायकवाड, भाऊसाहेब धनवटे, सचिन सोनवणे तसेच क्रिकेट स्पर्धेचे समन्वयक राजेंद्र पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, दि. २९ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान गोशाळा मैदानावर येवला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी भुजबळ करंडकाच्या माध्यमातून विविध क्रीडा स्पर्धा घेतल्या जात होत्या; मात्र काही काळ खंड पडला होता. आता पुन्हा या स्पर्धांना सुरुवात होत असून, क्रिकेटसह विविध खेळांना चालना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.




