उपोषणदेऊळगाव राजापाऊसपाणीबुलढाणामहाराष्ट्रविदर्भशेतकरीशेतीसामाजिक कार्यकर्तेसिंदखेड राजासोशल मीडिया

खरीप 2025…हे वर्ष शेतकऱ्याच्या आयुष्यातलं सर्वात काळजाला पिळवटून टाकणारं वर्ष ठरलं…

आभाळ फुटलं… पावसाने कहर केला… शेतकऱ्याने लेकरासारखं जपलेलं पीक

खरीप 2025…हे वर्ष शेतकऱ्याच्या आयुष्यातलं सर्वात काळजाला पिळवटून टाकणारं वर्ष ठरलं…

 

आभाळ फुटलं… पावसाने कहर केला…

शेतकऱ्याने लेकरासारखं जपलेलं पीक

घरात येण्याआधीच शेतात सडून गेलं…

हातात काहीच उरलं नाही… डोळ्यांसमोर फक्त हतबलता…

पण या वेदनेच्या काळात सुद्धा

शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा

शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर उभी राहिली…

दहा दिवस…

होय, तब्बल दहा दिवस अन्न-पाण्याचा त्याग करून

शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून उपोषण केलं…

शरीर कमजोर झालं, पण जिद्द तसूभरही कमी झाली नाही…

2023 मध्ये त्या संघर्षातूनच

8500 रुपयांची मदत 13,600 वर नेली…

हे कुणाच्या दयेने नाही…

तर शेतकरी योद्धा कृती समितीच्या लढ्याने मिळालं…

बागायती शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणून

पुन्हा उपोषण… पुन्हा लढा…

आणि शेवटी न्याय मिळवून दिला…

पण याही वर्षी…

अतिवृष्टी होऊन सुद्धा प्रशासन म्हणत होतं – पाऊसच पडला नाही…

ढगफुटी झाली… पाणी शेतात साचलं…

पण कागदावर मात्र सगळं सुरळीत…

तेव्हा शेतकरी योद्धा कृती समितीने

पाण्यात उतरून संघर्ष केला…

मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता…

पण एक पाऊलही मागे घेतलं नाही…

प्रशासनाचा दबाव आला…

धमक्या आल्या…

पण झुकलं नाही… थांबलं नाही…

अखेर प्रशासनाला जाग आली…

आणि शेतकऱ्याच्या मतदारसंघात मदत द्यायला भाग पाडलं…

2024 च्या पीक विम्यासाठी

मुंबईच्या मंत्रालयात जाऊन आंदोलनाचा इशारा दिला…

तेव्हा कुठे प्रशासन हललं…

मंत्रालयात पोहोचलो…

पोलीसांनी ताब्यात घेतलं…

पण त्या पोलिसांच्या संरक्षणातच

कृषी मंत्र्यांच्या कार्यालयात जाऊन

शेतकऱ्याचा आवाज पोहोचवला…

तेव्हा कुठे पीक विम्याचा मार्ग मोकळा झाला…

हा लढा कधीच स्वतःसाठी नव्हता…

हा लढा होता त्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी…

ज्याच्या घरात चूल पेटत नाही…

ज्याच्या लेकरांच्या डोळ्यात भूक दिसते…

जर शेतकरी योद्धा कृती समिती

असा जीवाचा आटापिटा करून लढत असेल…

तर आपण अजून किती दिवस घरात बसणार…?

आता वेळ आली आहे…

खांद्याला खांदा लावून उभं राहायची…

कारण आतापर्यंत जो न्याय मिळाला…

तो फक्त शेतकरी योद्धा कृती समिती आणि

सर्व शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळेच मिळाला…

आणि पुढचाही न्याय…

याच संघटनेच्या माध्यमातून,

याच एकजुटीतून मिळणार आहे…

आता निर्णय तुमचा आहे…

डोळ्यातलं पाणी पुसून उठणार…

की सगळं गमावून शांत बसणार…?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!