पळसखेड चक्का येथे मोठा अनर्थ टळला
गावठाण लाईनचे तार तुटून शॉर्ट सर्किट झाल्यामुळे परिसरात भीषण अग्नितांडव निर्माण झाले होते.

पळसखेड चक्का येथे मोठा अनर्थ टळला
विशेष प्रतिनिधी सिंदखेड राजा
गावठाण लाईनचे तार तुटून शॉर्ट सर्किट झाल्यामुळे परिसरात भीषण अग्नितांडव निर्माण झाले होते.
वेळेत आग आटोक्यात आली नसती, तर संपूर्ण गावालाही आगीचा वेढा पडण्याची शक्यता होती.
गावातील तरुण, नागरिक व ज्येष्ठ मंडळी यांनी धाडसाने पुढाकार घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या आगीत परिसरातील विहीर परिसर, विहिरीवरील साहित्य तसेच इतर काही साहित्य जळून नुकसान झाले आहे.
तसेच बखार जागा, ट्रॅक्टर व ट्रॅक्टरमधील साहित्य थोडक्यात बचावले.
परंतु अत्यंत गंभीर बाब म्हणजे, अशा प्रसंगी तात्काळ वीजपुरवठा बंद करण्याशिवाय आग विझवण्यासाठी पुढे जाणे धोकादायक होते.
त्यावेळी किनगाव राजा येथील MSEB कार्यालयाचा फोन बंद असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिक फोन करून लाईट बंद करावी लागली.
आपत्कालीन परिस्थितीतही कार्यालयाचा फोन बंद असणे ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधित विभागाने तात्काळ दखल घेण्याची गरज आहे.
श गावातील सर्व तरुण, नागरिक व ज्येष्ठ मंडळींच्या सतर्कतेमुळे आज मोठा अनर्थ टळला.




