क्राइमटॉप न्यूज़दुनियादेशबुलढाणामहाराष्ट्रराजस्थानलोकल न्यूज़शेतीशेती न्यूज

लुटारू कंत्राटदारावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करा; गरंजी ग्रामसभेचे १० लाख वसूल करण्यासाठी भाकपचा एल्गार!

लुटारू कंत्राटदारावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करा; गरंजी ग्रामसभेचे १० लाख वसूल करण्यासाठी भाकपचा एल्गार!

              जिल्हा:प्रतिनिधी तेजेश गुज्जलवार

मूलचेरा
तालुक्यातील गरंजी ग्रामसभेच्या हक्काचा आणि आदिवासींच्या घामाचा तब्बल १० लाख २३ हजार रुपयांचा पैसा कंत्राटदाराने हडपल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या लुटारू कंत्राटदारावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून थकबाकी वसूल करावी, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा) जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वात आज मूलचेरा तहसीलदारांना धडक निवेदन देऊन एल्गार पुकारण्यात आला.

नेमके प्रकरण काय?
ग्रामसभा गरंजी (ता. मूलचेरा) यांनी सन २०२४-२५ या वर्षात कक्ष क्रमांक ३९३, ३९५ व ३९६ मधील बांबू कटाई व विक्रीचा अधिकृत करार ‘हेवन ट्रेडिंग कंपनी’चे प्रोपरायटर सागर चंद्रशेखर मने यांच्याशी केला होता. करारानुसार कापलेल्या बांबूंचे एकूण मूल्य १५ लाख ७३ हजार ३६० रुपये इतके होते. मात्र, कंत्राटदाराने आतापर्यंत केवळ ५ लाख ५० हजार रुपयेच ग्रामसभेच्या खात्यात जमा केले आहेत. उर्वरित १० लाख २३ हजार ३६० रुपये गेल्या अनेक महिन्यांपासून थकवून ठेवले आहेत. वारंवार मागणी करूनही कंत्राटदार रक्कम देण्यास टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे.
> “हा आदिवासींच्या श्रमावर पडलेला दरोडा आहे!” – कॉ. सचिन मोतकुरवार
> याप्रसंगी आक्रमक पवित्रा घेत भाकपा जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले की, “संविधानिक ग्रामस्वराज्यात ग्रामसभेचा पैसा अडवून ठेवणे ही मोठी गंभीर बाब आहे. हा केवळ आर्थिक व्यवहार नसून लुटारू कंत्राटदाराने आदिवासी ग्रामसभेची केलेली फसवणूक आहे. प्रशासनाने केवळ नोटिसा न पाठवता या कंत्राटदारावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा. जर गरंजीच्या जनतेचा पैसा वसूल झाला नाही, तर भाकप संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडेल.”
>
प्रशासनाला जहाल इशारा
भाकपच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की, कंत्राटदाराने रक्कम थकविल्यामुळे गावातील नागरिकांचे आर्थिक गणित ठप्प झाले आहेत आणि बांबू कामगार आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणी विशेष लक्ष देऊन कंत्राटदाराकडून संपूर्ण रक्कम वसूल करावी आणि त्याला काळ्या यादीत टाकून कडक कारवाई करावी.
यावेळी निवेदन देताना भाकपचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार, गरंजी ग्रामसभेचे अध्यक्ष लालाजी हिचामी, सचिव संजय हिचामी आणि मोठ्या संख्येने ग्रामसभा सदस्य व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!