जयंतीधर्ममहाराजविदर्भ

श्री शंभूशेष महाराज यात्रा महोत्सवात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

मंगरूळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या

श्री शंभूशेष महाराज यात्रा महोत्सवात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

              वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे

मंगरूळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शंभूशेष महाराज संस्थानच्या वतीने दि. १२ जानेवारी रोजी ५२ वा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पंचक्रोशीतील तसेच परिसरातील हजारो भाविकांनी दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला.

यात्रा महोत्सवानिमित्त संस्थानच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि. ८ जानेवारी रोजी ५६ किलो आतील भव्य कबड्डी स्पर्धा, तर दि. १२ जानेवारी रोजी रक्तदान शिबिर व कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. या सर्व उपक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यानंतर यात्रेच्या दिवशी दुपारी ४ वाजता महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यासाठी सुमारे ३२ क्विंटल पोळी व भाजीचा महाप्रसाद भाविकांसाठी तयार करण्यात आला होता. महाप्रसाद वितरणाच्या कार्यात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग असून, शिस्तबद्ध नियोजनामुळे कोणताही अडथळा न होता भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या यात्रा महोत्सवामुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!