टेक्नोलॉजीटॉप न्यूज़दिल्ली NCRदुनियादेशमध्य प्रदेशमहाराष्ट्रयुवायूपीराजनीतिराजस्थानराज्यलोकल न्यूज़

विजेच्या धक्क्याने शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू

विजेच्या धक्क्याने शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू

शेतकरी महिलेचा महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे महिलेचा जागीच मृत्यू

 

जऊळका, दि. २८ (प्रतिनिधी रविंद्र बुधवत)

येथील एका शेतकरी महिलेचा विजेच्या धक्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक २८ ऑगस्ट रेजी दुपारी ४ वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी महावितरणच्या भोंगळ कारभाराला जबाबदार धरत गावातील नागरिकांचा संताप जनक वातावरण निर्माण झाले आहे.

जऊळका तालुका सिंदखेड राजा येथील मंगलबाई रंगनाथ सांगळे (वय ५७) या पती रंगनाथ सांगळे यांच्यासह सकाळी दहा वाजता शेतातील सोयाबीन निंदण्यासाठी गेल्या होत्या. शेतामध्ये असलेल्या विद्युत खांबाला लाईनचा ताण देण्यात आला होता. या ताणाला करंट असल्याने गेल्या पंधरा दिवसापासून या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी ढगफुटी सारखा पाऊस पडत असल्याने शेतातील ओल्या जमिनीवर काम करताना मंगलबाई यांचा हात त्या ताणाला लागला. त्यामुळे जबरदस्त विद्युत धक्का बसून हात चिटकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कालच झालेल्या पावसामुळे

शेतातील जमीन ओली असल्याने विजेचा प्रवाह अधिक तीव्र झाला. त्यामुळे हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली.

बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

महावितरणच्या सिंदखेड राजा उपविभाग अंतर्गत दुसर बीड कार्यालयासाठी कनिष्ठ अभियंता हे पद रिक्त असून सध्या किनगाव राजा येथील सहाय्यक अभियंता मालोकार यांच्याकडे प्रभार देण्यात आला आहे. या सर्व घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे महावितरणच्या भोंगळ कारभाराने सांगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळा असून हे दुःख कधी भरून न निघणारा आहे

ही घटना घडल्यानंतर प्रभार असलेल्या मालोकार यांनी घटनेच्या जबाबदारीचे भान न ठेवता सदर घटनास्थळी जऊळका येथे कंत्राटी पदावर असलेल्या आउट सोर्सिंग कर्मचाऱ्याला घटनेची माहिती घेण्यासाठी पाठवले व जबाबदारीपासून आपले हात झटकण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा सुरु आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!