टॉप न्यूज़दिल्ली NCRदुनियादेशमहाराष्ट्रराजनीतिराजस्थानराज्यलोकल न्यूज़

भुमराळा गावातील शेतकऱ्यांचा इशारा – चुकीच्या ई-पिक पाहणी ऍपमुळे शेतकऱ्यांचा वाढता संताप

भुमराळा गावातील शेतकऱ्यांचा इशारा – चुकीच्या ई-पिक पाहणी ऍपमुळे शेतकऱ्यांचा वाढता संताप

लोणार तालुका प्रतिनिधी : श्री. ज्ञानेश्वर मोरे

लोणार तालुक्यातील भुमराळा गावातील शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. शासनाने सुरू केलेल्या ई-पिक पाहणी ऍपमध्ये शेतकऱ्यांच्या नावावर असलेल्या गटातील जमीनीची नोंद प्रत्यक्ष ठिकाणी न दाखवता दुसऱ्याच गटात दाखवली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या नावाच्या गटातील पीक पाहणी करण्यासाठी इतरांच्या शेतावर जावे लागत असून यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

शेतकऱ्यांनी शासनाला स्पष्ट मागणी केली आहे की, गुगल लोकेशनद्वारे प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर असलेली जमीन अचूक नोंदवली जावी, अन्यथा भविष्यात शेतकऱ्यांमध्ये गंभीर वाद निर्माण होऊ शकतात. शासनाने या गंभीर चुकीकडे त्वरित लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

या आंदोलनामध्ये पुढील शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे:
ज्ञानेश्वर महादु मोरे, संतोष प्रल्हाद मोरे, महादु शंकर मोरे, संदीप कैलास मोरे, गजानन कैलास मोरे, रामेश्वर शिवाजी मोरे, दत्तारावजी मोरे, उत्तमराम भाऊ न्याहाळ, अनिता लक्ष्मण मोरे, रामप्रसाद मनोहर मोरे, नारायण महादु मोरे, मनोहर रुस्तुम मोरे, अंबादास रुस्तुम मोरे, राजकुमार दशरथ बोडखे, गजानन दशरथ बोडखे, नारायण तुळशीराम बोरुडे, अशोक हरीभाऊ मोरे, विष्णू हरीभाऊ मोरे, ज्ञानेश्वर आनंदा हंबिले, रामभाऊ साहेबराव टेकाळे तसेच इतर शेतकरी.

पुढील आठवड्यात शेतकरी लोणार तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार साहेबांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार आहेत. जर योग्य तो मार्ग निघाला नाही, तर शेतकरी लोकशाही मार्गाने आंदोलन उभारतील, असा ठाम इशारा भुमराळा गावाचे श्री. ज्ञानेश्वर महादु मोरे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!