टॉप न्यूज़दुनियादेशधर्ममध्य प्रदेशमहाराष्ट्रयुवाराजस्थानलोकल न्यूज़
खैरखेड गावातील “एक गाव – एक गणपती” परंपरेत आज गणेश विसर्जन उत्साहात संपन्न

खैरखेड गावातील “एक गाव – एक गणपती” परंपरेत आज गणेश विसर्जन उत्साहात संपन्न
खैरखेड, ता. सिंदखेड राजा –विशेष प्रतिनिधी – मधुकर मुंडे
गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू असलेली “एक गाव – एक गणपती” ही परंपरा आजही खैरखेड गावात भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील सर्व नागरिकांच्या सहभागाने मोठ्या थाटामाटात व शांततेत गणरायाचे विसर्जन झाले.
गावकऱ्यांनी विसर्जनावेळी एकमुखाने प्रार्थना केली – “गावातील शेतकऱ्यांवरील संकट दूर कर, शेतीमालाला योग्य भाव मिळू दे.”
ही परंपरा गावकऱ्यांच्या एकतेचे, श्रद्धेचे आणि शेतकऱ्यांवरील प्रेमाचे जिवंत उदाहरण ठरली आहे.




