लोणार नगरपालिकेत पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकला; सौ. मिरा भुषण मापारी नगराध्यक्षपदी 6467 मतांनी दणदणीत विजयी

“लोणार नगरपालिकेत पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकला; सौ. मिरा भुषण मापारी नगराध्यक्षपदी 6467 मतांनी दणदणीत विजयी
रघुनाथ आघाव – लोणार तालुका प्रतिनिधी
लोणार : लोणार नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत दणदणीत विजय मिळवला आहे. नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सौ. मिरा भुषण मापारी यांनी 3868 मतांच्या प्रचंड आघाडीसह विजयी होत सत्ता कायम ठेवली. एकूण 8 नगरसेवकांसह नगराध्यक्ष असे एकूण 9 जागांवर विजय मिळवत काँग्रेसने सलग दहा वर्षांची हुकूमत अधिक मजबूत केली आहे.
यामध्ये शिवसेना शिंदे गटाने 5 जागा, अपक्षांनी 5 जागा, भाजपा व एम आय एम यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकत आपले खाते उघडले आहे. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला खातेही उघडता आले नाही.
नगरपालिकेच्या प्रभागनिहाय विजेत्यांचा तपशील:
प्रभाग 1अ : हुमेरा शेख सदफ जमील (अपक्ष) – 813 मते
प्रभाग 1ब : उबेद अ. मुनाफ (अपक्ष) – 710 मते
प्रभाग 2अ : शेख नगमा बी. शेख जावेद (एम आय एम) – 767 मते
प्रभाग 2ब : शेख मकसुद शेख उस्मान (शिवसेना शिंदे गट) – 591 मते
प्रभाग 3अ : वर्षा संतोष मापारी (कॉंग्रेस) – 940 मते
प्रभाग 3ब : गजानन शालीकराम मापारी (शिवसेना शिंदे गट) – 695 मते
प्रभाग 4अ : सीमा नितीन शिंदे (कॉंग्रेस) – 1312 मते
प्रभाग 4ब : आबेद खान मोमीन खान (कॉंग्रेस) – 1271 मते
प्रभाग 5ब : शोभा भगवत देसाई (भाजपा) – 446 मते
प्रभाग 5अ : गुलाब चंद्रभान सरदार (अपक्ष) – 500 मते
प्रभाग 6अ : संध्या शाम राउत (कॉंग्रेस) – 232 मते
प्रभाग 6ब : अक्षय नंदकुमार इंगळे (शिवसेना शिंदे गट) – 189 मते
प्रभाग 7अ : वंदना अरुण जावळे (कॉंग्रेस) – 715 मते
प्रभाग 7ब : मयूर रमेशचंद गोलेच्छा (शिवसेना शिंदे गट) – 418 मते
प्रभाग 8अ : अनिकेत राजेश मापारी (कॉंग्रेस) – 400 मते
प्रभाग 8ब : सुप्रिया गजानन मापारी (शिवसेना शिंदे गट) – 425 मते
प्रभाग 9अ : साहेबराव मारोती पवार (अपक्ष) – 485 मते
प्रभाग 9ब : जुबेदा रमजान परसुवाले (कॉंग्रेस) – 736 मते
प्रभाग 10अ : पायल शुभम भगत (अपक्ष) – 488 मते
प्रभाग 10ब : पंढरी पुंजाजी चाटे (कॉंग्रेस) – 409 मते
या विजयामुळे काँग्रेसने केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रतापगडात मोठा राजकीय धक्का दिला आहे. मेहकर व लोणार या दोन्ही नगरपालिकांची सत्ता शिवसेना शिंदे गटाच्या हातून निसटून काँग्रेसकडे गेल्याने राजकीय समीकरणांमध्ये बदल दिसत आहेत.
लोणारमध्ये काँग्रेसची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून जनतेने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ मीरा भुषण मापारी यांनी म्हटलं आहे




