क्रीडाखेलखेळबुलढाणामहाराष्ट्रविदर्भशाळे कॉलेजसरकारी योजनासामाजिक कार्यकर्तेसिंदखेड राजा

तालुकास्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धेसाठी शिक्षक पतसंस्थेची भरीव मदत 

जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था सिंदखेडराजा यांनी १७ हजार

तालुकास्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धेसाठी शिक्षक पतसंस्थेची भरीव मदत

             प्रा दिलीप नाईकवाड बुलढाणा 

जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था सिंदखेडराजा यांनी १७ हजार रुपयांचा धनादेश देऊन या क्रीडा स्पर्धेसाठी भरीव मदत केलेली आहे हा धनादेश सिंदखेडराजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी स्वप्निल निकम आणि विस्तार अधिकारी गावडे सर तसेच समन्वयक आकाश आटोळे यांच्यामार्फत क्रीडा स्पर्धेसाठी सुपूर्त करण्यात आलेला आहे

सिंदखेडराजा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात तसेच क्रीडा संस्कृतीस सातत्याने प्रोत्साहन मिळावे , विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी सिंदखेडराजा शिक्षक पतसंस्था नियमित अग्रेसर राहिलेली आहे ही मदत देताना जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेचे उपाध्यक्ष बाळ पराड, माझी सचिव तथा संचालक लिंबाजी तायडे, तसेच खांडेकर सर उपस्थित होते.क्रीडा स्पर्धेसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल नुकतेच या शिक्षक पतसंस्थेचे बिनविरोध निवडून आलेले अशोक नागरे सर यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे अशोक नागरे सर हे सिंदखेडराजा मतदार संघातील शैक्षणिक,सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेऊन या संपूर्ण क्षेत्रात मोलाचे योगदान देतात. आजपर्यंत त्यांनी या क्षेत्रात अनेक प्रकारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपला सहभाग देऊन भरीव कामगिरी केलेली आहे. आताही क्रीडा स्पर्धेसाठी पतसंस्थेने १७ हजाराची आर्थिक मदत केली यामागे संस्थेचे अध्यक्ष अशोक नागरे यांचा पुढाकार राहिलेला असून बाळ पराड, उपाध्यक्ष रमेश जैवळ, सचिव सुभाष गवई, कोषाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांचाही मोलाचा वाटा राहिलेला आहे, गटशिक्षणाधिकारी, व विस्तार अधिकारी आणि समन्वयक यांनी पतसंस्थेच्या या सामाजिक व शैक्षणिक कार्यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळत असून भविष्यात यातून अनेक विद्यार्थी घडतील,आणि आपल्या परिसराचे नाव उज्वल करतील असा मनोदय त्यांनी व्यक्त केला व शिक्षक पतसंस्थेने केलेल्या मदतीबाबत आभारही व्यक्त केले. शिक्षक पतसंस्थेने केलेल्या मदतीबद्दल पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक नागरे व इतर पदाधिकारी यांचे क्रीडा क्षेत्र व शैक्षणिक क्षेत्र यातून स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!