टॉप न्यूज़दुनियादेशमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

आज झालेल्या मुसळधार पावसाने पिंपळगाव लेंडी येथील एका गायीचा मृत्यू तर बैलगाडी चालक गंभीर जखमी 

दिनांक 30 ऑगस्ट 2025

आज झालेल्या मुसळधार पावसाने पिंपळगाव लेंडी येथील एका गायीचा मृत्यू तर बैलगाडी चालक गंभीर जखमी

 

पत्रकार प्रतिनिधी महेंद्र इंगळे पिंपळगाव लेंडी

 

आज पिंपळगाव लेंडी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे दुपारी चार वाजेच्या दरम्यान अतिशय मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली, शेतामधून जनावरांना चारून गावाकडे परत जात असताना (दगडीच्या) ओढ्याला पूर आल्याने पाण्याच्या प्रवाहात बैलगाडी सह शेतकरी वाहून जात असताना बैलगाडी चालक नारायण भुजंगराव गायके यांनी खूप मोठ्याने आरडाओरडा केला त्याच परिसरामध्ये त्यांची शेती असल्यामुळे शरद नारायणराव गायके त्यांचा मुलगा त्या परिसरामध्ये होता आणि त्याच्या कानावर त्याच्या वडिलांची आवाजाची चाहूल लागताक्षणी त्यांनी लगेच दगडीच्या ओढ्या कडे धाव घेतली आणि बघितलं तर ओढ्याच्या पुरा मध्ये बैलगाडी आणी वडील आणि त्यांची गाय सुद्धा पुराच्या पाण्यात अडकलेल्या अवस्थेत त्याच्या डोळ्या देखत त्याचे वडील जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत होती शेतकरी पुत्र शरद गायके याने स्वतः मोठ्या धाडसाने पाण्यामध्ये उतरून वडिलांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला मोठ्या मेहनतीने बैल आणि गाईंना वाचवण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने यात एका गाईचा दुर्दैवी मृत्यू झाला,

शरद गायके यांनी दाखवलेले धाडस म्हणून त्यांच्या वडिलांचा आणि दोन बैलांचा जीव वाचवन्यात त्यांना यश आलं मात्र आज त्यांचे वडील गंभीर जखमी असून त्यांना जालना हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा सल्ला संबंधित किनगाव राजा येथील डॉक्टरांनी दिली अशी माहिती शरद गायके यांनी फोनवरून शेतकरी न्यूज शी बोलताना सांगितले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!