रामदास मेहेत्रे यांचे पत्नीसह आमरण उपोषण बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू

सार्वजनिक बांधकाम विभागाचा शेतकऱ्यांवर अन्याय!
रामदास मेहेत्रे यांचे पत्नीसह आमरण उपोषण बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू
सिंदखेडराजा शहर प्रतिनिधी – रवि ढवळे
| दिनांक : 17 सप्टेंबर
सिंदखेडराजा येथील शेतकरी रामदास मेहेत्रे यांनी आपल्या पत्नीसमवेत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सार्वजनिक बांधकाम विभाग, गटविकास अधिकारी पंचायत समिती व नगरपरिषद यांच्या विरोधात आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
मेहेत्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १५ सप्टेंबर रोजी कोणतीही परवानगी न घेता माझ्या स्वतःच्या शेतजमिनीतून रस्ता काढण्यात आला. या रस्त्यामुळे शेतातील पाण्याचा निचरा होण्याऐवजी पाणी साचून पीकांचे मोठे नुकसान होत आहे.
शेतकरी मेहेत्रे यांचे म्हणणे आहे की, २०११ पासून आजपर्यंत शेतजमिनीत झालेल्या प्रचंड नुकसानीचा योग्य मोबदला मिळावा. यासाठीच त्यांनी पत्नीसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.
यावेळी त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, नुकसानीचा भरपाई न मिळाल्यास उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल.




