किनगाव राजा मंडळातील शेतकऱ्यांचा आक्रोश – सरकारने नाही मदत केली तर आंदोलन पेटणार!”

िआ“किनगाव राजा मंडळातील शेतकऱ्यांचा आक्रोश – सरकारने नाही मदत केली तर आंदोलन पेटणार!”

विशेष प्रतिनिधी सावखेड तेजन
किनगाव राजा महसूल मंडळातील सावखेड, तेजन या गावांमध्ये 15 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी व ढगफुटीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेती वाहून गेली, तर इतर शेतांमध्ये पाणी साचल्याने कपाशी व सोयाबीनसह इतर पिके उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी हताश व हवालदिल झाले आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून सलग अतिवृष्टी, ढगफुटी व गारपीटीच्या संकटाने या भागातील शेतकरी सतत नुकसान सहन करत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप पंचनामे झाले नाहीत आणि मदतीचा निर्णयही घेण्यात आलेला नाही.
👉 शेतकऱ्यांची ठाम मागणी
जिरायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपये मदत
बागायती शेतकऱ्यांना 70 हजार रुपये मदत
पिकाचे पूर्ण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1 लाख रुपये भरपाई
👉 शेतकरी नेते विलास भाऊ विघ्ने यांचे वक्तव्य
“सरकारने आमच्या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून तातडीने मदत जाहीर करावी. शेतकरी जगला तरच शेती व देश वाचेल. शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळाली नाही तर आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा विचार करावा लागेल. ही वेळ सरकारने येऊ देऊ नये अशी आमची अपेक्षा आहे.”
✊ या ठिकाणी उपस्थित शेतकरी :
सरपंच संजय अचलखांब, अरुण केकान, विष्णू बुधवत, संजय बुधवत, कारभारी जायभाये, रावसाहेब जायभाये, छगनराव जायभाये, विशाल जायभाये, देवानंद जायभाये, तुळशीराम बुधवत, गजानन बुधवत, गोरखनाथ बुधवत, रामेश्वर बुधवत, बद्री जायभाये, हरिभाऊ जायभाये, कारभारी बुधवत,व इतर शेकडो शेतकरी.
⚡️ सरकारला प्रश्न
1. शंभर टक्के नुकसान होऊनही पंचनामे का झाले नाहीत?
2. दोन वर्षे सतत आपत्ती असूनही शेतकऱ्यांसाठी ठोस धोरण का नाही?
3. शेतकरी जगण्यासाठी मदतीची अपेक्षा करत आहे, पण त्याला उत्तर केव्हा मिळणार?
📢 अशी माहिती शेतकरी नेते विलास विघ्ने यांनी शेतकरी न्यूज शी बोलताना दिली.
तसेच, शेतकरी नेते विलास विघ्ने यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांना थेट विनंती करू किनगाव राजा महसूल मंडळ व आमचा तालुका ओला दुष्काळ जाहीर करा अशी विनंती केली
न शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.




