Uncategorized

सिंदखेड राजा तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसाचा कहर — शेतकरी उध्वस्त, सरकार मात्र गप्प!

सिंदखेड राजा तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसाचा कहर — शेतकरी उध्वस्त, सरकार मात्र गप्प!

 

किनगावराजा : प्रतिनिधी (असेफ कुरेशी)

सिंदखेड राजा तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. सोनोशी, सोयंदेव, रूम्हणा आणि खैरखेड या नदीकाठच्या गावांचा संपर्क या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे तुटून पडला आहे. सतत प्रचंड प्रमाणात कोसळणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेकडो एकर शेतीवर पावसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी घाम गाळून उभे केलेले सोयाबीन, कापूस आणि इतर हंगामी पिके अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाचे व स्वप्नांचे पाणी झाले असून शेतकरी उध्वस्त झालेला आहे.

नुकसानीचा पंचनामा करून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने प्रशासनाकडे होत असली तरी सरकार मात्र निश्चित बसून गप्प आहे. शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असतानाही सरकारकडून कोणताही ठोस निर्णय न घेण्यात येत नाही, ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी बाब ठरत आहे.

शेतकऱ्यांच्या बांधावर सरकार येणार नाही का? शेतकरी जगायचे कसे हा मोठा प्रश्न आज उपस्थित झाला आहे. सरकारने तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांचा विश्वास परत मिळवला पाहिजे, अन्यथा या असंतोषाचा ज्वालामुखी फुटल्याशिवाय राहणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!