वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम व खेळ स्पर्धांनी रंगला दिवस

वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम व खेळ स्पर्धांनी रंगला दिवस
सिंदखेड राजा (ता. 11 ऑक्टोबर 2025) —
संत सावता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सिंदखेड राजा यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष व विद्यमान सरपंच प्रा. बळीराम जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम साजरा करण्यात आला. या निमित्ताने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय खेळ महोत्सव व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात चित्रकला, संगीत खुर्ची, निबंध लेखन, खो-खो, कबड्डी आणि धावण्याच्या स्पर्धा रंगल्या. विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या प्रतिभेचे दर्शन घडविले. विशेषतः लहान विद्यार्थ्यांचा सहभाग आणि रंगतदार स्पर्धांनी वातावरण आनंदी झाले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बळीराम जाधव उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य प्रा. सुधाकर गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. आयोजनात शिक्षक तेजराव घुगे, अभिजित मेहत्रे, वैष्णवी अंभोरे (सांस्कृतिक विभागप्रमुख), रुख्मिणी तोर, पायल पवार, दिपाली सातपुते, उषा काळे, व मनीष बुंधे यांनी परिश्रम घेतले.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास दराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रोशनी चांडक, डॉ. शुभम सोनुने, डॉ. अक्षय शिंगणे, तसेच प्रवीण गायकवाड, दीक्षा गोदाम, नारायण सूरवसे, रामदास महाडिक, आणि शंभूराजे मानतकर आदी कर्मचारी उपस्थित होते.
सामाजिक जाणीव, शिक्षण आणि खेळभावना यांचा सुंदर मिलाफ साधत या उपक्रमाने विद्यार्थ्यांसह गावातही सकारात्मक वातावरण निर्माण केले.




