तपोवननाशिक

नाशिक शहरातील तपोवन येथील वृक्षतोडीबाबत असलेला जनविरोध अधिकाधिक बळकट होत चालला आहे. 

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तपोवन भागास भेट देवून पाहणी

नाशिक शहरातील तपोवन येथील वृक्षतोडीबाबत असलेला जनविरोध अधिकाधिक बळकट होत चालला आहे.

नाशिक येवला प्रतिनिधी प्रविण पाटील

          अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तपोवन भागास भेट देवून पाहणी केली, त्यानंतर पुढील नियोजनासाठी एक बैठक देखील आयोजित करण्यात आली.

याप्रसंगी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रोहिणीताई वाघ, उत्तर महाराष्ट्र सचिव ज्योतीताई काजळे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अविनाशभाऊ वाघ, नाशिक महिला उपाध्यक्ष ज्योतीताई परदेशी, आशाताई भोईर (घर आंगण बहुद्देशीय संस्था),उत्तर महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष देविदास आंबिलकर,सुनंदाताई विस्पुते (परिवर्तन कामगार सेना), शहराध्यक्ष जावेदभाई शेख, उपाध्यक्ष राजाभाऊ सिरसाट, नाशिक संघटक सुवर्णाताई उदावंत, तालुकाध्यक्ष सविताताई आहेर, उपाध्यक्ष दिलीपभाऊ गायकवाड, कला क्षेत्र संजय बलकवडे, श्यामभाऊ डावरे, तालुका, भगूर शहराध्यक्ष राजाभाऊ मांडे, दिव्यांग जिल्हाध्यक्ष सूरदास पावसे, तालुका उपाध्यक्ष ज्योतीताई गरूड, ओझर अध्यक्ष एकनाथ लोखंडे आणि जनसेवक अमोलभाऊ भागवत उपस्थित होते.

समाजशास्त्र, समाजसेवा म्हणजे संघटित कार्यरचना, जिच्या मार्फत मुख्यतः सामाजिक संसाधनांचे संवर्धन, संरक्षण व सुधारणा साध्य करण्याचे योजनाबद्ध प्रयत्न करत असताना. तसेच कायद्याच्या आणि नैतिक चौकटीच्या आत हेतूपूर्वक कृती करण्यास प्राधान्य देण्याबाबत नियोजन करण्यात आले.

समाजसेवा ही संकल्पना आधुनिक राष्ट्रांच्या उभारणीमधील एक मूलभूत घटक आहे व ह्या सर्वांना अनुसरून चर्चा करण्यात आली.

नाशिक मधील तपोवन येथिल वृक्षतोडीचा गंभीर मुद्दा (प्रशासनाने MICE hub साठी धरलेला हट्ट, आणि सामाजिक प्रतिनिधींकडून यास झालेला अर्थपूर्ण विरोध) त्यावरचे नियोजन आणि प्राणिमात्रांसाठी एक नियोजनशील सहकार्य करण्यासाठी

तपोवन परिसरातील वृक्षतोडीविरोधात सर्व जनतेने एका ध्येयाने लढावे. ही लढाई नाशिक शहराच्या पर्यावरणासाठी आणि भविष्यासाठी आहे. ही चळवळ कोणा एका व्यक्तीची नसून ती आपल्या सर्वांची ‘लोकचळवळ’आहे असे नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत यांनी स्पष्ट केले.

         सामूहिक लढा आणि एकजूट टिकवणे गरजेचे, आपल्याला झाडे वाचवायची आहेत आणि त्यासाठी आपली एकजूट महत्त्वाची आहे. वादात वेळ घालवण्यापेक्षा आपल्याला प्रत्यक्ष कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून, एकजुटीने तपोवनच्या पर्यावरणासाठी लढण्याची सद्यस्थितीत गरज आहे हे सर्वानुमते सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!