डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन
तेल्हारा येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारा संचालित श्री शिवाजी हायस्कूल,

डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन
तेल्हारा | प्रतिनिधी : राजेश पाटील खारोडे
तेल्हारा येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारा संचालित श्री शिवाजी हायस्कूल, तेल्हारा येथे शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त तेल्हारा तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा समिती सदस्य सुधीर बापू देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. गावंडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सौ. विद्याताई देशमुख (मुख्याध्यापिका), सौ. शर्वरी हिंगणकर (जयंती उत्सव प्रमुख), धनंजय भंगाळे (जयंती उत्सव प्रमुख) उपस्थित होते.
यावेळी शिक्षक प्रतिनिधी म्हणून सुनील वंजारी, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी विजय दहे तसेच शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रंगभरण स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आपली कलागुणांची छटा सादर करत स्पर्धेला रंगत आणली.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सूत्रसंचालन बळीराम कुवारे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शांतीकुमार सावरकर यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.




