जय जिजाऊजयंतीबुलढाणामहाराष्ट्रमहाराष्ट्र माता जिजाऊ मासाहेबयात्रा महोत्सवसावित्रीबाई फुलेसिंदखेड राजा

जिजाऊ सृष्टीवर सावित्रीबाई फुले – माँसाहेब जिजाऊ दशरात्रोत्सवास उत्साहात सुरुवात

मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे मराठा सेवा संघाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या

जिजाऊ सृष्टीवर सावित्रीबाई फुले – माँसाहेब जिजाऊ दशरात्रोत्सवास उत्साहात सुरुवात

          प्रा. दिलीप नाईकवाड – बुलढाणा

मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे मराठा सेवा संघाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान सावित्रीबाई फुले – माँसाहेब जिजाऊ दशरात्रोत्सवाची भव्य व उत्साहपूर्ण सुरुवात करण्यात आली. या दहा दिवसांच्या कालावधीत विविध सांस्कृतिक, प्रबोधनात्मक व वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या दशरात्रोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी सिंदखेडराजा नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शिवश्री सौरभ तायडे व त्यांच्या पत्नी शिवमती जयश्री तायडे, मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे व शिवमती रूपालीताई गारोळे, लोणारच्या नगराध्यक्ष शिवमती मीराताई भूषण मापारी व शिवश्री भूषण मापारी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सवाच्या प्रचार व प्रसारासाठी सज्ज करण्यात आलेल्या रथाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सिंदखेडराजा नगरपरिषदेचे नगरसेवक व नगरसेविका श्रेया खरात, पोर्णिमा भुसारे, सिंधुताई ठाकरे, पूजाताई खुरपे, पुष्पा बारवकर, सोनाली मेहेत्रे, प्रेम कोरडे, दिलीप आढाव, गणेश चोरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यामध्ये मराठा सेवा संघाचे राज्य सहसचिव डॉ. मनोहर तुपकर, अभियंता रविकांत काळवाघे, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, जिल्हाध्यक्ष रवींद्र चेके, जिजाऊ सृष्टीचे व्यवस्थापकीय अध्यक्ष सुभाषराव कोल्हे, विलास तेजनकर, विश्वनाथ बाहेकर, सुखदेव बुरकुल, विनायक दंदाले, विष्णू म्हसागर, सागर खांडेभराड, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अँड. उर्मिला हाडे, वारकरी परिषदेच्या ज्योतीताई जाधव, मुख्याधिकारी आशिष बोबडे, अँड. राजेंद्र ठोसरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक योगेश पाटील व तालुकाध्यक्ष मधुकर गव्हाड यांचा समावेश होता.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. जिजाऊ सृष्टीतील माँसाहेब जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सावित्रीबाई फुले व माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. यानंतर अँड. उर्मिला हाडे व रंजना देशमुख यांनी सादर केलेल्या जिजाऊ वंदनेने उपस्थितांना भावनिक केले.

विचारमंचावर उपस्थित नगराध्यक्ष, नगरसेविका तसेच सिंदखेडराजा परिसरातील पत्रकार बांधवांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवश्री राजेंद्र ठोसरे यांनी केले. आपल्या मनोगतात नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी मराठा सेवा संघाची स्थापना १९९० साली झाल्यानंतर संघाने सातत्याने जिजाऊ जन्मोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केल्याचे नमूद केले. तसेच जिजाऊ जन्मोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठा सेवा संघास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

मुख्याधिकारी आशिष बोबडे यांनीही आपल्या भाषणातून माँसाहेब जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रमात सावखेड तेजन येथील जनता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची विशेष दाद मिळवली.

या कार्यक्रमास संजय धोरण, संजय विखे पाटील, रमेश ढगे, राजकुमार जाधव, ज्योतीताई खांडेभराड, सविता खांडेभराड, लता साबळे यांच्यासह मातृतीर्थ सिंदखेडराजातील युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदा यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष मधुकर गव्हाड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!