एटापल्लीक्राइमगडचिरोलीभ्रष्टाचारमहाराष्ट्रविदर्भसरकारी योजना

बोगस नाली बांधकाम प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते मनीष दुर्गे यांचे थेट आरोप

प्रभाग १३ मधील काम म्हणजे सरळसरळ सार्वजनिक निधीची लूट” मनीष दुर्गे

बोगस नाली बांधकाम प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते मनीष दुर्गे यांचे थेट आरोप

प्रभाग १३ मधील काम म्हणजे सरळसरळ सार्वजनिक निधीची लूट” मनीष दुर्गे

        जिल्हा | प्रतिनिधी तेजेश गुज्जलवार

एटापल्ली: नगरपंचायतीअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये सुरू असलेल्या नाली बांधकामावर सामाजिक कार्यकर्ते मनीष दुर्गे यांनी जोरदार हल्लाबोल करत थेट आरोप केले आहेत. सदर नाली बांधकाम हे नियमबाह्य, निकृष्ट व बोगस पद्धतीने करण्यात येत असून यामागे ठेकेदार–अधिकारी संगनमत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

“हे काम म्हणजे विकास नव्हे तर सार्वजनिक निधीची उघड लूट आहे. योग्य मोजमाप, खोली आणि दर्जेदार साहित्य न वापरता घाईघाईत काम उरकले जात आहे. भविष्यात ही नाली कोसळल्यास त्याला जबाबदार कोण?” असा थेट सवाल मनीष दुर्गे यांनी उपस्थित केला.

स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासन मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “नगरपंचायत प्रशासन डोळेझाक करत असून दोषींना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे,” असेही ते म्हणाले.
या प्रकरणी त्यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करत तात्काळ चौकशीची मागणी केली आहे. दोषी ठेकेदारांसह संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, कामाचे तांत्रिक ऑडिट, तसेच निकृष्ट नाली बांधकाम पाडून नव्याने नियमांनुसार दर्जेदार काम करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
“जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, तर नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते मनीष दुर्गे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!