पत्रकारमहाराष्ट्रयुवाविदर्भसामाजिक कार्यकर्तेसिंदखेड राजा

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या विदर्भ अध्यक्षपदी सचिन खंडारे यांची निवड

सामाजिक कार्य आणि पत्रकारिता क्षेत्रात नावलौकिक असलेले बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार सचिन खंडारे

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या विदर्भ अध्यक्षपदी सचिन खंडारे यांची निवड

     बुलढाणा / प्रतिनिधी प्रा. दिलीप नाईकवाड

सामाजिक कार्य आणि पत्रकारिता क्षेत्रात नावलौकिक असलेले बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार सचिन खंडारे यांची भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाउंडेशनद्वारा संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या विदर्भ अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे अधिकृत पत्र राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब केदारे व राष्ट्रीय सचिव डॉ. अविनाश झोटिंग यांनी दिनांक १८ जानेवारी रोजी प्रदान केले.

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती ही संपूर्ण देशभर कार्यरत असून विविध क्षेत्रांतील ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवणे, फसवणूकग्रस्त ग्राहकांना न्याय मिळवून देणे तसेच ग्राहकांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी समिती सक्रियपणे कार्य करते. ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जनजागृती करणे आणि तक्रारींचे प्रभावी निवारण करणे हा या समितीचा प्रमुख उद्देश आहे.

आपल्या निवडीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सचिन खंडारे यांनी सांगितले की, बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असून ग्राहकांना आपल्या हक्कांची पुरेशी माहिती नसल्याने अनेकदा ते न्यायापासून वंचित राहतात. कृषी केंद्रे, पेट्रोल पंप, बँका, मोबाईल व इलेक्ट्रॉनिक दुकाने, कापड दुकाने आदी ठिकाणी प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या आधारे ग्राहकांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी समितीच्या माध्यमातून ठोस प्रयत्न केले जातील.

तसेच बुलढाणा जिल्ह्यात एक सक्षम व संघटित ग्राहक चळवळ उभी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून ग्राहक जनजागृती मोहिमा, मार्गदर्शन शिबिरे व तक्रार निवारण उपक्रम राबविण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सचिन खंडारे यांच्या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष शालिकराम चव्हाण, विदर्भ पदाधिकारी सुनील अंभोरे, डॉ. गंगाराम उबाळे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप नाईकवाड, प्राचार्य डी. एन. पांचाळ, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील तसेच संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष व पत्रकार विजय देशमुख यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!