सिनगाव जहांगीर जिल्हा परिषद लढवणार अमोल काकड; कामाचा आलेख, संघर्षाची पार्श्वभूमी आणि भगव्याचा निर्धार
देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहांगीर येथून जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात

सिनगाव जहांगीर जिल्हा परिषद लढवणार अमोल काकड; कामाचा आलेख, संघर्षाची पार्श्वभूमी आणि भगव्याचा निर्धार
प्रतिनिधी – वाघाळा : योगेश काकड
देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहांगीर येथून जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी शिवसेनेचे तालुकाप्रमुख युवा नेतृत्व अमोल काकड यांनी केली असून, त्यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण सर्कलमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.
अमोल काकड हे केवळ नाव नाही, तर गरीब कुटुंबातून संघर्ष करत घडलेले नेतृत्व आहे. लहान वयातच सामाजिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी “तरुण असूनही ज्येष्ठांनाही लाजवेल” अशी कामगिरी करून दाखवली आहे. गावागावातील प्रश्न, सर्वसामान्यांचे दुःख, आरोग्य, रस्ते, पाणी, रोजगार अशा मूलभूत विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला.
संघर्षातून नेतृत्वाकडे वाटचाल
सन 2020 मध्ये माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अमोल काकड यांच्यावर विश्वास टाकत त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. ही जबाबदारी त्यांनी केवळ पदापुरती न ठेवता प्रत्यक्ष कामातून सिद्ध केली.
दवाखान्यासाठी मदत असो, रस्त्यांच्या प्रश्नासाठी पाठपुरावा असो किंवा प्रशासनाच्या दारात उभं राहून न्याय मागणं असो—जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चे, आंदोलन, रस्ता रोको करत नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यात अमोल काकड यांनी पुढाकार घेतला.
शिवसेनेत प्रवेश आणि विश्वासार्ह उमेदवारी
त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचे खासदार व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अमोल काकड यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेत त्यांना शिवसेना तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी दिली.
सिनगाव जहांगीर हे जिल्हा परिषद सर्कल असल्याने, डॉ. शशिकांत खेडेकर आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे अधिकृत तिकीट अमोल काकड यांनाच मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात कोणतीही शंका नाही.
“मातीचं सोनं करेन” – कामावर विश्वास
“मला संधी मिळाली तर सिनगाव जहांगीरमध्ये विकासाचं सोनं घडवीन,” असा ठाम विश्वास अमोल काकड यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना दिला आहे.
भगवा फडकवणारच, असा निर्धार व्यक्त करत युवा शिवसेना तालुकाप्रमुख अमोल काकड यांनी ही निवडणूक केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर कामाच्या जोरावर जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी लढवण्याचा संकल्प केला आहे.



