शेतकऱ्यांचा घास हिरावला – सरकार आंधळं, प्रशासन बहिरं!

शेतकऱ्यांचा घास हिरावला – सरकार आंधळं, प्रशासन बहिरं!
जालना जिल्हा प्रतिनिधी – सय्यद इलियास सादेक
आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील बोरगाव गावात तर परिस्थिती अगदी भयंकर आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांचा चिखल झाला, घामाने जोपासलेलं वर्षभराचं श्रम पाण्यात वाहून गेलं.
शेतकऱ्याच्या हातातला तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला.
खत-बी-बियाण्यासाठी घेतलेली कर्जं फेडायची कशी, हा प्रश्न शेतकऱ्यांना वेड लावतोय.
घरी संसार चालवायचा कसा? मुलांचे शिक्षण कसे करायचे?
पण सरकार आणि प्रशासन मात्र गप्प बसून तमाशा बघतंय!
शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करणारे सत्ताधारी नेते आणि अधिकारी हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे शत्रू ठरत आहेत.
शेतकऱ्यांचं संपूर्ण वर्ष पाण्यात गेलंय आणि सरकार अजून मदतीची घोषणा करायला धजावत नाही.
हेच सुरू राहिलं तर शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि मग त्याची जबाबदारी केवळ शासनाची असेल!
शेतकऱ्यांची होरपळ आता थांबलीच पाहिजे! शासनाने तात्काळ मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मलमपट्टी केली नाही, तर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा रोष ज्वालामुखीसारखा उसळेल.
उपस्थित शेतकरी :
प्रल्हाद नानाभाऊ शेळके, राजकुमार अण्णा डोके ,श्रीहरी भिकाजी कायंदे, सर्जेराव तिरमख डोके, राजकुमार अण्णा दगडू डोके, सुरेश पांडुरंग गोरे, संदीप शहादेव डोके, सचिन भारत तुरेराव, दिलीप निवृत्ती खैरे



