सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान किनगाव राजा प्रतिनिधी : असेफ कुरेशी

सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान 
किनगाव राजा प्रतिनिधी : असेफ कुरेशी
सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा परिसरात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २२ सप्टेंबर रोजी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली. शेतांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचून राहिल्याने कापूस, तूर व सोयाबीन या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष नितीन भाऊ सानप, सतीश वायाळ, कैलास पंडित, गजानन ढोबळे, शिवानंद पालवे, अजय नागरे, तुषार शिंपे, शिवाजी काकड, संतोष हरकळ, बबन भाऊ वाघ, रामू वाघ आदींनी शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी कृषी सहाय्यक बागडे साहेब उपस्थित होते.
शेतकरी रमेश काशिनाथ काकडे यांच्या शेतात संपूर्ण सोयाबीन पिक पाण्याखाली गेले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
👉 याशिवाय परिसरातील इतर अनेक शेतकऱ्यांची शेतीसुद्धा पाण्याखाली गेली असून मोठे नुकसान झाले आहे.
या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.




