नैसर्गिक आपत्तीने शेतकरी कंगाल, शासनाने तातडीने सरसगट विमा जाहीर करावा

नैसर्गिक आपत्तीने शेतकरी कंगाल, शासनाने तातडीने सरसगट विमा जाहीर करावा
सिंदखेडराजा (प्रतिनिधी)
दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने रा. यू. काँ. प्रदेश सरचिटणीस तथा बळीवंशचे संस्थापक नितीन कायंदे यांनी खरीप हंगाम-२०२५ मधील पीकविमा सर्व शेतकऱ्यांना सरसगट मंजूर करावा अशी ठाम मागणी करत जिल्हा कृषी अधीक्षक तसेच कृषी मंत्री मा. दत्ता मामा भरणे यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सिंदखेडराजा तालुक्यातील सुमारे ६४ हजार शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी विविध पिकांचा विमा काढलेला आहे. शासन निर्णय क्र. प्रपीवीमी-२०२५/पी.क्र.६६/११.मे.ई.क्र.१०३५०९३ दि. २५ जून २०२५ नुसार, नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण देणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे ही शासनाची जबाबदारी आहे.
मात्र, यावर्षी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी, रोगराई आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अक्षरश: उभे पिक नष्ट झाले असून शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. या गंभीर परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून सर्व शेतकऱ्यांना सरसगट विमा मंजूर करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर नितीन कायंदे यांच्यासह नितीन शेळके पाटील, रवी आघाव, सिद्धार्थ जाधव, वैभव मिनासे, यासीन शेख, अभिजित राजे, आरिफ चौधरी, विकास ठाकरे, सागर सांगळे, कचरुजी भारस्कर, कल्याण पालवे, सतीश कायंदे, शेख रेहमान, प्रकाश सांगळे, मदन आघाव, भगवान पालवे, रामकिसन नागरे, गबाजी ढाकणे, परमेश्वर खरात, बाळू खरात, सतीश खरात, अनिल शेवाळे, गणेश मुंढे, केशव जायभाये, सुरेश राठोड, आशिष पोंधे, गोपाल जायभाये, अशोक मोगल, अभय मोगल, गजानन चव्हाण, विजय कुहिरे पाटील आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या होत्या.
सदर निवेदनाची प्रत मा. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा प्रतिनिधी पीकविमा कंपनी तसेच आमदार मनोजभाऊ कायंदे, खासदार प्रतापराव जाधव, पालकमंत्री मकरंद आबा पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आदी मान्यवरांना देण्यात आली




