लहान विद्यार्थ्यांचा मोठा आदर्श! संत सावता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने पूरग्रस्तांसाठी धाव घेतली” 🌧️

लहान विद्यार्थ्यांचा मोठा आदर्श! संत सावता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने पूरग्रस्तांसाठी धाव घेतली” 🌧️
शेतकरी न्युज चे मुख्य संपादक श्री बालाजी सोसे
सिंदखेड राजा तालुक्यातील संत सावता इंग्लिश स्कूल आणि कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करत “सहायता निधी फेरी”चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
पूरग्रस्त भागातील लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी आवश्यक मदत मिळावी या उदात्त हेतूने शाळेच्या विद्यार्थीनींनी आणि विद्यार्थ्यांनी शहरभर मदतीची फेरी काढली. शहरातील पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, नगरपरिषद कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, बस स्थानक, बाजारपेठ, राजमाता राजवाडा परिसर तसेच शासकीय बँका आदी ठिकाणी जाऊन प्रत्येक ठिकाणी त्यांनी लोकांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रेरित केले.
या फेरीत जमा झालेला निधी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या मदतीतून पूरग्रस्तांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.
या उपक्रमात शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बळीराम जाधव सर, प्राचार्य सुधाकर गोफणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक तेजराव घुगे, अभिजित मेहेत्रे, वैष्णवी अंभोरे, रुख्मिणी तोर, दिपाली सातपुते, पायाल पवार, उषा काळे व मनीष बुंधे यांनी विद्यार्थ्यांना साथ दिली.
लहान वयातच समाजकारणाची गोडी निर्माण करत, शेतकऱ्यांसह पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात देणाऱ्या या लहान विद्यार्थ्यांच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या उपक्रमामुळे समाजात “शिक्षणासोबत संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव” रुजवण्याचा सुंदर संदेश विद्यार्थ्यांनी दिला आहे.




