पळसखेड ते सावखेडपर्यंत बिबट्याचा उगव! शेतकरी हादरले – वनविभागावर ताशेरे!!”

“पळसखेड ते सावखेडपर्यंत बिबट्याचा उगव! शेतकरी हादरले – वनविभागावर ताशेरे!!”
पळसखेड चक्का – चक्का – सावखेड तेजन परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन!
शेतकरी धास्तावले; प्रशासन आणि वनविभाग अजूनही निद्रिस्त?
आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी,
सकाळी 9 ते 10 या दरम्यान पळसखेड चक्का येथे,
तर सकाळी 10 ते 11 वाजता सावखेड तेजन – खडक डबजवळ
बिबट्याचे स्पष्ट दर्शन झाल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे.
या सलग दर्शनामुळे परिसरात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले असून गावोगावी एकच खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांचा संतप्त प्रश्न –
“प्रशासनाला अजून किती वेळ लागणार जाग यायला?”
याबाबतची संपूर्ण माहिती
शेतकरी योद्धा कृती समितीचे बुलढाणा जिल्हा संस्थापक अध्यक्ष श्री. बालाजी सोसे
आणि
शेतकरी नेते व शिवसेना नेते श्री. विलास विघ्ने यांनी वनविभागाला फोनवरून तातडीने दिली.
वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी – देऊळगाव राजा येथील श्री. गायकवाड साहेब यांनी
उद्याच्यादिवशी ट्रॅप कॅमेरे बसवले जातील, असे सांगितले.
मात्र शेतकरी यावर समाधानी नाहीत;
त्यांची मागणी —
फक्त कॅमेरे नव्हे, पथके, पिंजरे आणि संपूर्ण यंत्रणा तैनात करा! गावोगावी जनजागृतीची जोरदार मागणीशेतकरी व ग्रामस्थांमधील भीती कमी करण्यासाठी पुढील मागण्या करण्यात आल्या —
सर्व गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवा
बिबट्यापासून कसे सावध राहावे याचे मार्गदर्शन द्या
धोक्याच्या वेळी नागरिकांनी कसा प्रतिसाद द्यावा याची माहिती द्या
भीती कमी करण्यासाठी वनविभागाने प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन करावे
या मागण्या गायकवाड साहेबांनी त्वरित मान्य केल्या असून त्यांनी विघ्ने व सोसे यांना फोनवर सांगितले की —उद्याच्यादिवशी ट्रॅप कॅमेरे बसवणार जनजागृती मोहीम सुरू करणार शेतकऱ्यांची
व ग्रामस्थांची भीती कमी करण्यासाठी सूचना देणार




