वाढदिवस

येवला तालुका येथील रायते, निमगांव मढ, पारेगांव, चिचोंडी खुर्द बदापूर येथे रामदास पाबळे परिवाराकडून विदयार्थ्यांना शालेय भेट वस्तूंची वाटप.

येवला तालुका येथील रायते, निमगांव मढ, पारेगांव, चिचोंडी खुर्द बदापूर येथे रामदास पाबळे परिवाराकडून विदयार्थ्यांना शालेय भेट वस्तूंची वाटप.

       नाशिक येवला प्रतिनिधी प्रविण पाटील 

आज भागवत एकादशी औचित्य साधून रामदास पाबळे (आण्णा )यांच्या नातवाच्या श्रेयस प्रकाश पाबळे याचे वाढदिवसाच्या निमित्ताने निमगांव मढ, पारेगांव, रायते, चिचोंडी खुर्द हनुमान वाडी बदापूर येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांना शालेय वस्तूंची वाटप करण्यात आली. निमगांव येथील असे अनोखा कार्यक्रम प्रथम होतोय.यासाठी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी पाबळे कुटुंबियांचे कौतुक केले.आणि शाळेतील मुला मुलींना आनंदहर्ष वाटला. रामदास आण्णा यांनी आपण समजाचे कुठे तरी दयेयक लागतो त्यामुळे सामाजिक सेवा घडावी यासाठी नातु श्रेयस प्रकाश पाबळे याचे वय २१ पूर्ण झाल्याने आम्ही फक्त जिल्हा परिषद शाळेचा पटात वाढ व्हावी आणि जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना शिकण्यासाठी भरारी मिळावी. गोर गरिब मुलांना मदतीचा हात म्हणून आम्ही हे कार्य पाबळे कुटुंब करत आहोत. यामधून शालेय वस्तु भेट देतांना विद्यार्थी विदयार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आई वडिलांचे व आपले गावाचे शाळेचे नांव उज्वल करावे यामुळे समाजातील मुलं मुली ips psi डॉक्टर, वकील क्लास वन अधिकारी बनावेत आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे व महाराष्ट्र राज्याचे नांव रोशन करुन सैनिक शेतकरी बनून माय भूमी जन्म भूमी चे रक्षण करावे असे आपल्या मनोगतातून मत व्यक्त केले. मुख्याध्यापक देवरे सर पाटील सर यांनी स्तुत्य कार्यक्रम संदर्भात श्रेयस पाबळे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. माने सर यांनी सूत्रसंचालन जाधव मॅडम, खराडे मॅडम,रायते येथील मुख्याध्यापक झुंजारे सर, सुनीता महाजन मॅडम, कुऱ्हाडे मॅडम खळे मॅडम बदापूर येथील बचाव बच्छाव सर, दुकळे मॅडम,भामरे मॅडम, थोरात मॅडम, पारेगांव गोरडे मॅडम, खैरनार मॅडम, मारवाडी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणात शिस्त बद्ध मध्ये कार्यक्रम साठी व्यवस्थापन ठेवले. केले.smc अध्यक्ष सुदाम लभडे यांनी आभार मानले. यावेळी किरण लभडे, संतोष लभडे, रंगनाथ लभडे आदी ग्रामस्थ रायते पारेगांव, चिचोंडी खुर्द, बदापूर, मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!