श्री संत झोलेबाबा यात्रा महोत्सव निमित्त चिखली येथे भव्य महाआरोग्य मेळाव्याचे यशस्वी आयोजन
१५२० रुग्णांची तपासणी, ३५ युवकांचे रक्तदान, गरजू रुग्णांना मोफत औषध व चष्मे वाटप

श्री संत झोलेबाबा यात्रा महोत्सव निमित्त चिखली येथे भव्य महाआरोग्य मेळाव्याचे यशस्वी आयोजन
१५२० रुग्णांची तपासणी, ३५ युवकांचे रक्तदान, गरजू रुग्णांना मोफत औषध व चष्मे वाटप
वाशिम जिल्हा प्रतिनिधी – विश्वास कुटे
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून गेल्या दहा वर्षांपासून अखंड सुरू असलेली सामाजिक आरोग्यसेवा यावर्षीही श्री संत झोलेबाबा यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने चिखली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या भव्य महाआरोग्य मेळाव्यात तब्बल १५२० रुग्णांची विविध आजारांवर मोफत तपासणी करण्यात आली. त्यासोबत गरजू व गरीब रुग्णांना मोफत औषधे तसेच चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
या आरोग्य शिबिराची सुरुवात श्री संत झोलेबाबा संस्थानचे अध्यक्ष वसंतरावजी सुर्वे, सचिव मांगुळकर साहेब, कोषाध्यक्ष माणिकरावजी सावके, टोपले साहेब, विश्वस्त हरणे काका, चौधरी काका, नारायण यांच्यासह उपस्थित रुग्ण व संस्थानच्या सर्व विश्वस्तांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन डोफेकर, ज्ञानेश्वर चौधरी, निवृत्ती सुर्वे हे उपस्थित होते.
शिबिरात तपासणीसाठी विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांची सुसज्ज टीम उपलब्ध होती. यामध्ये हृदयरोग तज्ञ डॉ. सिद्धार्थ देवळे, डॉ. अतुल काळूशे, श्री हॉस्पिटलचे सुबोध महल्ले सर, अस्थिरोग तज्ञ डॉ. किशोर मुखमाले यांचा समावेश होता. विठ्ठल हॉस्पिटलच्या टीममध्ये डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे, डॉ. मधुकर बोरकर, डॉ. सूरज जाधव, डॉ. गजानन पोफले पाटील, डॉ. उमेश भुतेकर, डॉ. अर्चना बोरकर, डॉ. तुकाराम धोटे उपस्थित होते. तसेच धोटे मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. नितीन धोटे, डॉ. प्रविण धोटे व डॉ. ऋचा प्रविण धोटे यांनी सेवा दिली.
याशिवाय नेत्ररोग तज्ञ डॉ. जुगल चीरानिया, त्वचारोग तज्ञ डॉ. उमेश ठोंबे व डॉ. उमेश सपकाळ, दंतरोग तज्ञ डॉ. कमलेश सपकाळ, फिजिओथेरपी तज्ञ डॉ. उन्नती मिलिंद पाकधने, पंचकर्म चिकित्सा तज्ञ डॉ. पपिता वऱ्हाडे तसेच विठ्ठल हॉस्पिटलचे डॉ. हर्षल राऊत यांनी आपली सेवा बजावली. औषध वाटपासाठी फार्मासिस्ट उमेश सुर्वे, रक्त तपासणीसाठी सुनील सावके यांनी काम पाहिले. रक्तसंकलनासाठी शासकीय रक्तपेढी, अकोला येथील टीम उपस्थित होती. या शिबिरात ईसीजी, शुगर, बीपी तसेच इतर आवश्यक तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठीही आवश्यक ते सहकार्य देण्यात आले.
या प्रसंगी ३५ युवकांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली. शिबिराला अनेक मान्यवरांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. यामध्ये खासदार श्री संजयभाऊ देशमुख यांच्यासह रामदास पाटील सुर्वे, शालिकराम पाटील राऊत, सचिन भाऊ परळीकर, राजेश पाटील राऊत, रवि पाटील राऊत, विनोद पाटील जाधव, दौलतभाऊ इंगोले, कवी पाटील पाकधने, देविदास मुखमाले, बंडू वैद्य, गोपाल पाटील सावके, विलास लांभाडे, डॉ. सुनील राऊत, अर्जुन सुर्वे, पांडुरंग कोठाले, अतिश चौधरी, अशोक हांडे, गजानन सावके, बबनराव सावके, भागवत शिंदे, मोहन वानखडे, सतीश वानखडे, राम चौधरी, सुरेंद्र राऊत, ज्ञानेश्वर डोंगरे, धीरज राऊत, संदीपान भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
या महाआरोग्य मेळाव्याच्या यशस्वी नियोजन व अंमलबजावणीसाठी रुग्णसेवा ग्रुपच्या सदस्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. आलेल्या प्रत्येक रुग्णाला सहकार्य व योग्य मार्गदर्शन करण्यात आले. या आयोजनासाठी अध्यक्ष शिवा सावके, सचिव शुभम डोफेकर, सदस्य सूरज साखरे, सुजित सुर्वे यांच्यासह प्रमोद चौधरी, संतोष लांभाडे, सचिन राऊत, गणेश बोथे, विक्की जयस्वाल, राम सुर्वे, सुरज हांडे, सुरज ठाकरे, सुशील वाघ, प्रमोद सुर्वे, मोहन सावके, मधुकर सावके, ज्ञानेश्वर सावके, राहुल सावके, महेंद्र सावके, हरी सावके, गजानन सावके, मनोज सावके, समाधान सावके, एकनाथ सावके, संतोष बोडखे, निलेश सावके, गणेश सावके, सुजित सावके, अनिल सावके, पांडू खोरणे, आदित्य इंगोले, गोलू चौधरी, शिवा चौधरी, ओम सुर्वे, ज्ञानेश्वर सुर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या भव्य उपक्रमासाठी श्री संत झोलेबाबा संस्थान, चिखली तसेच चिखली, लाठी, हिरंगी, गोगरी परिसरातील समस्त भक्तगणांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे आयोजकांनी यावेळी सांगितले.




