आरोग्य सेवाआरोग्य सेवा हीच ईश्वर सेवाग्रामीण रुग्णालयमहाराष्ट्रयुवाविदर्भहॉस्पिटल

२५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान विशेष सिकलसेल अ‍ॅनिमिया तपासणी अभियान

सिकलसेल अ‍ॅनिमिया हा अनुवंशिक आणि गंभीर स्वरूपाचा रक्तविकार असून

२५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान विशेष सिकलसेल अ‍ॅनिमिया तपासणी अभियान

नागरिकांनी तपासणी करून घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

  जिल्हा प्रतिनिधी : तेजेश गुज्जलवार, एटापल्ली

सिकलसेल अ‍ॅनिमिया हा अनुवंशिक आणि गंभीर स्वरूपाचा रक्तविकार असून वेळेत निदान व योग्य उपचार न झाल्यास रुग्णाच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. या आजाराचे प्रमाण विशेषतः आदिवासी व दुर्गम भागात अधिक आढळून येत असल्याने त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाच्या वतीने दि. २५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत विशेष सिकलसेल अ‍ॅनिमिया तपासणी व उपचार अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाअंतर्गत नागरिकांनी आपल्या नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा इतर शासकीय आरोग्य संस्थांमध्ये जाऊन सिकलसेल तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तपासणीदरम्यान संशयित व बाधित रुग्णांची नोंद करून त्यांना आवश्यक ते समुपदेशन, उपचार व पुढील वैद्यकीय मार्गदर्शन दिले जाणार आहे.

विशेषतः दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांसाठी मोफत तपासणी सुविधा, समुपदेशन तसेच आवश्यक औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली असून, आजाराबाबत जनजागृती करण्यावरही भर देण्यात येत आहे. सिकलसेल हा आजार अनुवंशिक असल्याने विवाहपूर्व व गर्भधारणेपूर्व तपासणीचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले जाणार आहे.

या संदर्भात गट विकास अधिकारी डॉ. आदिनाथ आंधळे यांनी सर्व नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, स्वतःसह कुटुंबातील सदस्यांची तपासणी करून वेळेत उपचार घ्यावेत, असे आवाहन केले आहे. तसेच सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी परस्पर सहकार्याने हे अभियान यशस्वी करावे, असेही त्यांनी नमूद केले.

सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांतून सिकलसेल अ‍ॅनिमियामुक्त समाज निर्मिती करणे शक्य असून, या दिशेने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!