गौरव पुरस्कारपत्रकार

फुलसावंगीचे सुपुत्र सचिन कोकणे यांना ‘विदर्भवीर पुरस्कार २०२६’ प्रदान

वन्यजीव संवर्धनातील उल्लेखनीय कार्याचा नागपूर येथे गौरव

फुलसावंगीचे सुपुत्र सचिन कोकणे यांना ‘विदर्भवीर पुरस्कार २०२६’ प्रदान

वन्यजीव संवर्धनातील उल्लेखनीय कार्याचा नागपूर येथे गौरव

          यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / विक्की भिसे

फुलसावंगी येथील प्राणीमित्र व वन्यजीव रक्षक सचिन कोकणे यांच्या वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण रक्षणातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत नागपूर येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात त्यांना ‘विदर्भवीर पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. वन्यजीव व निसर्गासाठी निस्वार्थ भावनेने रात्रंदिवस कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीच्या वतीने दिनांक ४ जानेवारी रोजी या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सचिन कोकणे हे गेल्या अनेक वर्षांपासून वन्यजीव संरक्षणासाठी सातत्याने कार्यरत असून त्यांनी केवळ प्राण्यांचे रक्षण करण्यापुरतेच आपले कार्य मर्यादित ठेवलेले नाही. समाजामध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती निर्माण करणे, जैवविविधतेचे महत्त्व पटवून देणे आणि निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा संदेश देणे, यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. शाळा, महाविद्यालये तसेच जंगलव्याप्त आणि ग्रामीण भागातील गावांमध्ये जाऊन ते वन्यजीव व पर्यावरणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत.

मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील वाढता संघर्ष कमी करण्यासाठी नागरिकांना योग्य मार्गदर्शन करणे, सुरक्षिततेच्या उपाययोजनांची माहिती देणे तसेच प्रसंगी वनविभागासोबत समन्वय साधून बचाव कार्यात सक्रिय सहभाग घेणे, हे त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. वन्यजीवांसोबतच त्यांना पक्षी अभ्यासाची विशेष आवड असून विविध पक्षी गणना, पर्यावरणीय सर्वेक्षण आणि निसर्ग उपक्रमांमध्ये ते वनविभागासोबत नियमितपणे कार्यरत असतात.

सचिन कोकणे हे ‘एम. एच. २९ हेल्पिंग हँड्स वाईल्ड ॲडव्हेंचर अँड नेचर क्लब’ या संस्थेचे महागाव तालुका अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळत असून युवकांना निसर्गसेवेकडे वळवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक युवक पर्यावरण संरक्षणासाठी पुढे येत असून समाजात सकारात्मक बदल घडताना दिसत आहे.

या सन्मानामुळे फुलसावंगी परिसरासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून तसेच वन्यजीव प्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांकडून सचिन कोकणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निसर्गासाठी निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा असा सन्मान होणे ही अभिमानाची बाब असून शासनानेही अशा उपक्रमांचे आयोजन करून वन्यजीव व पर्यावरणासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना अधिक प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा यावेळी सचिन कोकणे यांनी व्यक्त केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!