फुलसावंगी येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
ग्राम पंचायत च्या जुन्या इमारतीत पत्रकार कार्यालयाचे उद्घाटन

फुलसावंगी येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
ग्राम पंचायत च्या जुन्या इमारतीत पत्रकार कार्यालयाचे उद्घाटन
यवतमाळ प्रतिनिधी / विक्की भिसे
आद्य पत्रकार तथा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त फुलसावंगी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या जुन्या कार्यालयाची इमारत फुलसावंगी पत्रकार संघासाठी देण्यात येऊन, त्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सारजाबाई वाघमारे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार गजानन पराते, पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक अमोल राठोड, जेष्ठ पत्रकार गजानन वाघमारे, जेष्ठ पत्रकार संजय भगत, गणेश भोयर उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच कुणाल नाईक, विजयराव महाजन, जानी नवाब, डॉ.चंदन पांडे, दिनेश नाईक, हिरामण आडे, योगेश वाजपेयी, बाबु खान पठाण, नरेंद्र शिंदे, आरिफ लाला, शेख मजहर, अमरदिप दळवे, रविंद्र पांडे, गोधाजी कांबळे, वसंता भिसे, अजय देशपांडे, तंटामुक्त अध्यक्ष कयाम नवाब, डॉ.अब्दुल कुंदन, इमरान पठाण, बबन शेळके, आझम लाला,शमिम कुंदन, मोहम्मद युनूस, शेख फारुख, रमेश जाधव, रवी पटवे यांच्यासह फुलसावंगी व परिसरातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गजानन पराते यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा उल्लेख करून पत्रकारांनी समाजप्रबोधनाची भूमिका प्रामाणिकपणे निभावावी, असे मत व्यक्त केले. पत्रकार संघासाठी स्वतंत्र कार्यालय उपलब्ध झाल्याने पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शेख तसलीम यांनी केले, तर आभार शैलेश वानखेडे यांनी मानले.




