अपघातक्राइमघातपातपोलीसमहाराष्ट्रमहिलावाशिम

वाशिम रेल्वे स्टेशन परिसरातील महिला हत्येचा २४ तासांत छडा

आरोपी पोलिसांच्या ताब्यात; वाशिम पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

वाशिम रेल्वे स्टेशन परिसरातील महिला हत्येचा २४ तासांत छडा

आरोपी पोलिसांच्या ताब्यात; वाशिम पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

       वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे

वाशिम :

वाशिम रेल्वे स्टेशन परिसरात एका निष्पाप महिलेचा निर्घृण खून झाल्याची घटना समोर येताच संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. एका आईचा, बहिणीचा, ताईचा जीव घेण्याइतके क्रूर कृत्य करणाऱ्या आरोपीला वाशिम पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत बेड्या ठोकत कायद्याचा धाक काय असतो, हे ठामपणे दाखवून दिले आहे.

दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी रेल्वे स्टेशन परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात सदर महिलेची डोक्यात दगड मारून निघृण हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून वाशिम शहर पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा व उपविभागीय पोलीस अधिकारी यांची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.

ही हत्या केवळ गुन्हा नसून समाजाच्या माणुसकीवर घाला असल्याने पोलीस प्रशासनाने तपासाला सर्वोच्च प्राधान्य दिले. मृत महिला व आरोपी दोघेही सुरुवातीला अनोळखी असल्याने तपास मोठे आव्हान होता. मात्र पोलिसांनी हार न मानता परिसरातील ४० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित आरोपीची ओळख पटवली.

तांत्रिक विश्लेषण, गोपनीय यंत्रणा आणि मैदानी तपास यांच्या जोरावर आरोपीचा माग काढण्यात आला. दरम्यान मृत महिला ही पंचशील नगर, वाशिम येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. तपास अधिक तीव्र करत आरोपीने गुन्ह्यानंतर रेल्वेने अकोला येथे पलायन केल्याची शक्यता लक्षात येताच विशेष पथक अकोला येथे रवाना करण्यात आले.

रात्रभर सर्च ऑपरेशन राबवत स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या पथकाने दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरातून संशयित आरोपीस ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीचे नाव संतोष रामराव खंडारे (रा. अडुळा बाजार, ता. दर्यापूर, जि. अमरावती) असे असून त्यास अटक करून पुढील कारवाईसाठी वाशिम येथे आणण्यात आले आहे.

ही संपूर्ण धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड व उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपासात पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, संजय चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश बांगर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

तसेच पोअंम राजकुमार यादव, संदीप दुतोंडे, अमोल इरतकर व दीपक घुगे यांचे मोलाचे योगदान लाभले. पुढील तपास सपोनि अरुण नागरे करीत आहेत.

एका महिलेचा जीव घेणाऱ्याला कायद्यापासून सुटका नाही, असा कडक संदेश वाशिम पोलिसांनी दिला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असतानाच, गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण करणारी ही कारवाई नागरिकांमध्ये पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे.

महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!