दुसरबीड मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा
जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथे छत्रपती संभाजी महाराजांचा ४१२ वा राज्याभिषेक सोहळा

दुसरबीड मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा
प्रा दिलीप नाईकवाड बुलढाणा
जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथे छत्रपती संभाजी महाराजांचा ४१२ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला
येथील युवक व गावकऱ्यांच्या वतीने पहाटे छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पूजन करण्यात आले.दिवसभर अभिवादन करण्यासाठी छत्रपतींच्या स्मारकावर लोकांची येजा सुरू होती त्यानंतर सायंकाळी सात वाजता गावकऱ्यांच्या वतीने व विविध पक्षातील मान्यवरांच्या वतीने दुग्धाभिषेक,करून विधिवत पूजन करण्यात आले राज्याभिषेक दिन असल्यामुळे फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा करण्यात आली
यावेळी शिवसेना नेते गजेंद्र देशमुख,राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जुनेद अली,गजानन देशमुख, प्रा.सागर सांगळे,राम देशमुख,पत्रकार बाळासाहेब भोसले,वैभव गायकवाड, ऋषिकेश देशमुख, हरिहर देशमुख, शुभम तांबोळी,अतुल गुंजाळ,धीरज गुंजाळ, उमेश देशमुख, शरदराव देशमुख,शेख रब्बानी,
पंकज देशमुख,रामदास वैद्य,आदींनी पूजन केले
यावेळी शिवव्याख्याते वैभव गायकवाड यांनी महाराजांच्या शौर्य तथा जीवन कार्यावर प्रकाश टाकला तर ऋषिकेश देशमुख यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे कर्तृत्व विशद करून तरुणांना मार्गदर्शन केले या सोहळ्याला एकनाथ पवार,माऊली वायाळ, मुदतसरअली, विनोद छाजेड, बंटी छाजेड, सुमित देशमुख,पवन देशमुख,योगेश देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख,शंकर बिथरे,यांची उपस्थिती होती



