चिखली लव्हाळा रोडवर रोडरॉबरीचा थरार पंधरा वाहनांवर दगडफेक साखरखेर्डा पोलिसांचा रात्रभर बंदोबस्त
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मेहकर मार्गावरील लव्हाळा जवळ रात्री रोड रॉबरीचा भयानक थरार अनुभवायला

चिखली लव्हाळा रोडवर रोडरॉबरीचा थरार पंधरा वाहनांवर दगडफेक साखरखेर्डा पोलिसांचा रात्रभर बंदोबस्त
प्रा दिलीप नाईकवाड बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मेहकर मार्गावरील लव्हाळा जवळ रात्री रोड रॉबरीचा भयानक थरार अनुभवायला मिळाल्याने परिसरात खळबळ माजली असून भीतीचे वातावरण आहे पाटोदा फाट्याजवळ अज्ञात चोरट्यांनी वाहनांचा रस्ता अडून जाणारा येणाऱ्या वाहनांवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली या घटनेत तब्बल या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या १२ ते १५ वाहनांच्या काचा फुटल्याने रात्री प्रवास करणाऱ्या वाहन चालकां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहेत
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी हायवे रोडवर दगड टाकून तसेच प्रवासी निवाऱ्यातील बाकडे रस्त्यावर आडवे टाकून आणि वाहने थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र काही वाहन चालकांनी प्रसंगावधान ठेवत गाड्यांना थांबवता वेगात पुढे नेल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान प्रवासी निवाऱ्याच्या आडून जाणाऱ्या वाहनांवर जोरदार दगडफेक करण्यात आल्याने अनेक वाहनांचे काचा फोडल्या मुळे नुकसान झालेले आहे.प्रसंगी सैलानी येथे दर्शनासाठी जात असतानां साखरखेर्डा येथील बाबुशेठ कुरेशी यांच्या चार चाकी वाहनाचे टायर फुटले मात्र क्रुझर वाहनात जवळपास दहा प्रवासी असल्याने चोरट्यांनी पळ काढला आणि रोड रॉबरीचा मोठा प्रयत्न फसला घटनेची माहिती साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड, दुय्यम ठाणेदार गणेश डोईफोडे,पोलीस कॉ.विनायक परिवार यांच्यासह साखरखेर्डा, चिखली पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले संपूर्ण पोलीस पथकांनी रात्रभर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवत दुसऱ्या बाजूला शोध मोहीम राबवण्यात आली मात्र संशईत चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत फरार झाले. रोड रॉबरीचा प्रयत्न असल्यामुळे चोरटे आजूबाजूच्या गावामध्ये चोरीचा प्रयत्न करू शकतात या शक्यतेमुळे पोलीस यंत्रणेने परिसरातील पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी, आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले, रात्रीच्या वेळी अनोळखी ठिकाणी वाहन थांबवू नये असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले,या परिसरातील सवड येथील ग्रामविकास अधिकारी गौतम गवळी यांच्या शेतातील कोंबड्या, एक क्विंटल कापूस, आणि सोयाबीन चोरीला गेल्याचा प्रकार मात्र सकाळीच उघडकीस आला याबाबत साखरखेर्डा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.सलग घडलेल्या घटनांमुळे जिल्ह्यातील राज्य महामार्ग सुरक्षेच्या बाबतीत बऱ्याच दिवसानंतर मात्र प्रश्न उपस्थित झालेला आहे.



