शिरसगाव, ता. येवला : श्री वज्रेश्वरी माता मंदिर वर्धापन दिन सोहळा भक्तिभावात साजरा
शिरसगाव (ता. येवला) येथील ग्रामदैवत श्री वज्रेश्वरी मातेच्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा

शिरसगाव, ता. येवला : श्री वज्रेश्वरी माता मंदिर वर्धापन दिन सोहळा भक्तिभावात साजरा
नाशिक | येवला प्रतिनिधी : प्रविण पाटील
शिरसगाव (ता. येवला) येथील ग्रामदैवत श्री वज्रेश्वरी मातेच्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आज अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हरिनाम कीर्तन कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
या कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. अक्रूर महाराज साखरे यांच्या सुमधुर व प्रभावी कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनातून त्यांनी भक्ती, श्रद्धा, सदाचार आणि समाजात एकोप्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या प्रवचनाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी मंदिर व ग्रामस्थांच्या वतीने ह. भ. प. अक्रूर महाराज साखरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराजांनी आयोजकांनी केलेल्या सत्काराचा नम्रतेने स्वीकार केला. तसेच वज्रेश्वरी मातेच्या कृपेने गावात शांतता, समृद्धी आणि सौहार्द नांदावे, अशी प्रार्थना त्यांनी केली.
या वर्धापन दिन सोहळ्याला माजी सभापती संजय बनकर, डॉ. प्रवीण बुल्हे, नितीन गायकवाड, भगवान ठोंबरे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, मान्यवर, महिला-पुरुष आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंदिर विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ आणि युवकांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




