बुलढाणामहाराष्ट्रविदर्भशेतकरीशेतीसिंदखेड राजा

वाघाळा येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मांजरे परिवाराला दिली सांत्वनपर भेट

वाघाळा येथे दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी स्व. बनाबाई दगडुबा मांजरे यांचे वयाच्या सुमारे 85 व्या वर्षी


वाघाळा येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मांजरे परिवाराला दिली सांत्वनपर भेट

                वाघाळा प्रतिनिधी योगेश काकड

वाघाळा येथे दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी स्व. बनाबाई दगडुबा मांजरे यांचे वयाच्या सुमारे 85 व्या वर्षी पहाटे 5 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मांजरे परिवारावर शोककळा पसरली असून गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्व. बनाबाई मांजरे या शांत, कष्टकरी व संस्कारी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या जाण्याने परिवारासह नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

या दुःखद घटनेची माहिती मिळताच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता वाघाळा येथे मांजरे परिवाराच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट दिली. त्यांनी कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करत त्यांच्या दुःखात सहभागी होत मानसिक आधार दिला. यावेळी त्यांनी, “देव या दुःखातून सावरण्याची शक्ती मांजरे परिवाराला देवो,” अशी भावना व्यक्त केली.

याप्रसंगी बोलताना शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले, “जो जन्माला येतो, त्याला एक ना एक दिवस मृत्यू अटळ आहे. हे जीवनाचे कटू सत्य कुणालाही चुकलेले नाही. मात्र अशा कठीण प्रसंगी समाजाने एकत्र येऊन दुःखी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांची मने हेलावून गेली.

या सांत्वनपर भेटीप्रसंगी गावातील युवा मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. यामध्ये समाधान सोनुने, जनार्दन सोनुने, शेषराव घुगे, धनंजय नागरे, दिनेश माळेकर, नंदू वायाळ, नंदू सानप यांचा समावेश होता. तसेच शेतकरी न्यूजचे वाघाळा येथील पत्रकार योगेश काकड हेही उपस्थित होते.

या भेटीमुळे मांजरे परिवाराला मानसिक आधार मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, दुःखाच्या काळात सामाजिक बांधिलकी व मानवी संवेदना जपण्याचा संदेश या निमित्ताने समाजात पोहोचला आहे. गावात एकोप्याचे व सहवेदनेचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!