घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री बालाजी महाराज अश्विन यात्रा उत्सवास प्रारंभ

घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री बालाजी महाराज अश्विन यात्रा उत्सवास प्रारंभ
प्रतिनिधी शेतकरी न्यूज श्री दिलीप भाऊ नाईकवाड
देऊळगाव राजातील प्रतितिरुपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री बालाजी महाराज मंदिरात सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर घटस्थापना करून ३३३ वर्षांची परंपरा असलेल्या ऐतिहासिक आश्विन यात्रा उत्सवास सुरुवात झाली.
सकाळी सुवर्णकार समाजाने सोन्याचे दागिने, सिंहासन व चांदीची पूजावस्त्रे उजळून श्रींच्या सेवेस अर्पण केली. या सेवेबद्दल संस्थानच्यावतीने सुवर्णकार समाजाचा सन्मान करण्यात आला.
श्रींच्या उत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी २१ ब्राह्मणवृंद अनुष्ठानास बसले. मंत्रोच्चारात श्री बालाजी महाराज, लक्ष्मीमाता व पद्मावतीमाता यांच्या मूर्तींचा अभिषेक करून गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात आली. सायंकाळी महाआरतीस भाविकांची मोठी उपस्थिती होती
या वेळी श्री बालाजी संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापक किशोर बीडकर, मानकरी, ब्राह्मणवृंद व अनेक भक्त उपस्थित होते.
यात्रेतील प्रमुख कार्यक्रम
मंगळवार, दि. ३० सप्टेंबर : मंडपोत्सव
बुधवार, दि. १ ऑक्टोबर : दसऱ्याच्या मध्यरात्री १२ वाजता पालखी मिरवणूक
गुरुवार, दि. २ ऑक्टोबर : पालखी संपूर्ण शहर प्रदक्षिणा करून मंदिरात परत
शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर : सूर्योदयी ५.४५ वा. लळित उत्सवाची सांगता
📍 ठिकाण : श्री बालाजी महाराज मंदिर, देऊळगाव राजा, तालुका देऊळगाव, जिल्हा बुलढाणा
प्रसिद्धी प्रमुख
श्री बालाजी संस्थान, देऊळगाव राजा




