कॉलेज शाळामहाराष्ट्रवाशिमशाळे कॉलेज

कामरगाव येथे स्काऊटगाईड पथकाच्या वतीने ‘खरी कमाई सेवा महोत्सव’ संपन्न

कामरगाव पी.एम.श्री. जिल्हा परिषद विद्यालय, कामरगाव येथील स्काऊट–गाईड पथकाच्या संयुक्त विद्यमाने नवीन

कामरगाव येथे स्काऊटगाईड पथकाच्या वतीने ‘खरी कमाई सेवा महोत्सव’ संपन्न

           वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे

कामरगाव पी.एम.श्री. जिल्हा परिषद विद्यालय, कामरगाव येथील स्काऊट–गाईड पथकाच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्षानिमित्त ‘खरी कमाई सेवा महोत्सव’ आयोजित करण्यात आला. दि. २ जानेवारी २०२५ रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. सुरेश राठोड, पर्यवेक्षक गोपाल खाडे व प्रा. विकास रुईकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट सतीश चव्हाण आणि गाईड दिपाली खोडके यांनी विद्यालय परिसरात या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दिपाली लोमटे, कामरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सय्यद कलीम, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य देविदास भटकर, प्रशांत देशमुख, मजहर खान आदी मान्यवर उपस्थित होते. स्काऊट–गाईडच्या ‘खरी कमाई सेवा महोत्सव’ अंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या खाण्याच्या पदार्थांचे तसेच विविध खेळांचे स्टॉल उभारले होते. विद्यार्थ्यांनी इडली,सांभार,मठरी,कचोरी,समोसा, भेळ, केक, पाणीपुरी यांचे 74 स्टॉल लावले होते. मेहंदी काढून देण्याचा स्टॉल यावेळी लावण्यात आला होता. काहीजणांनी भरपूर नफा या व्यवसायातून कमावला.या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, कष्टाची किंमत आणि प्रामाणिक कमाईचे महत्त्व रुजवणे हा होता.

या महोत्सवातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या श्रमातून मिळणाऱ्या कमाईचे मोल अनुभवातून समजले. लहान वयातच स्वतः काही करून उभे राहण्याची सवय लागून स्वावलंबनाचा संस्कार रुजविण्यात आला. तसेच प्रामाणिक मार्गाने कमावण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना उमगले. वस्तू तयार करणे, सेवा देणे, नियोजन करणे यामुळे विद्यार्थ्यांची उद्योगशीलता व सर्जनशीलता वाढीस लागली. गटात काम करताना संघभावना, सहकार्य, जबाबदारी व नेतृत्वगुण विकसित झाले. मिळालेल्या कमाईचा उपयोग समाजोपयोगी कार्यासाठी करावा, हा समाजसेवेचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपण काही करू शकतो हा आत्मविश्वास दृढ झाला. या ‘खरी कमाई सेवा महोत्सवाच्या’ यशस्वीतेसाठी सतीश चव्हाण, दिपाली खोडके, गोपाल खाडे, चंद्रशेखर पिसे, नीता तोडकर, धन्नू गारवे तसेच सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!