
हरवलेले व चोरीस गेलेले ५ मोबाईल शोधण्यात एटापल्ली पोलीस स्टेशनला यश
जिल्हा: प्रतिनिधी तेजेश गुज्जलवार
आजच्या डिजिटल युगात मोबाईलचा वाढता वापर लक्षात घेता मोबाईल हरवणे किंवा चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा घटनांनंतर मोबाईलचा गैरवापर होऊन ऑनलाईन व सायबर गुन्हे घडण्याची शक्यता अधिक असते. ही बाब लक्षात घेऊन एटापल्ली पोलीस स्टेशनने तांत्रिक कौशल्याचा प्रभावी वापर करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सन २०२५ मध्ये आतापर्यंत एटापल्ली पोलीस स्टेशनमार्फत एकूण ₹८४,०००/- किमतीचे ५ हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधून काढण्यात यश आले असून, हे मोबाईल संबंधित तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सर यांच्या आदेशानुसार सायबर गुन्हे व मोबाईल चोरी प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार शासकीय CEIR पोर्टल (ceir.gov.in) तसेच तांत्रिक कौशल्याच्या माध्यमातून मोबाईलचा शोध घेण्यात आला.
जुलै २०२५ ते आतापर्यंतच्या कालावधीत CEIR पोर्टलच्या सहाय्याने शोध घेण्यात आलेले हे सर्व मोबाईल पोलीस रेजिंग डे निमित्त आज दिनांक ०५/०१/२०२५ रोजी पोलीस स्टेशन एटापल्ली येथे सहायक पोलीस निरीक्षक श्री. मोतीराम मडावी यांच्या हस्ते तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले.
यावेळी एटापल्ली पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले की, मोबाईल हरवला किंवा चोरीस गेल्यास तात्काळ ceir.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. तसेच मोबाईल हरविल्यास घाबरून न जाता त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. सध्या वाढत असलेल्या सायबर फसवणुकीच्या घटनांपासून सावध राहावे व ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० / १९४५ या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सर, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक सर व उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली श्री. चैतन्य कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत एटापल्ली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोनि. मच्छिद्र नागरगोजे, सपोनि. मोतीराम मडावी, पोउपनि. गजानन साखरे, पोहवा भिवा हिचामी, पोहवा प्रभाकर नाईक, पोहवा भास्कर ऊईके, मपोना गायत्री नैताम, पोशि. मोहन शिंदे व मपोशि. प्रियंका तुलावी यांनी मोलाची भूमिका बजावली.



