धर्मबुलढाणामकर संक्रातमहाराष्ट्रमहिलाविदर्भसिंदखेड राजा

सिंदखेड राजा येथील शिवशक्ती नगर मधील महिलांनी वाना सोबत केले वस्त्रदान 

आज दिनांक 14.01.2026 वार बुधवार रोजी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर

सिंदखेड राजा येथील शिवशक्ती नगर मधील महिलांनी वाना सोबत केले वस्त्रदान

 

   शहर प्रतिनिधी सिंदखेड राजा रवी भाऊ ढवळे

आज दिनांक 14.01.2026 वार बुधवार रोजी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर एक उपक्रम राबवला आहे. शिवशक्ती नगर मधील महिला दरवर्षी वटपौर्णिमा असो किंवा मकर संक्रांत महिलांच्या सणांचे अवचित साधून नवनवीन उपक्रम राबवत असतात यावर्षी त्यांनी मकर संक्रांतीचे अवचित साधून नगरपरिषद अंतर्गत सफाई कामगार करणाऱ्या महिलांना साडीवाटप केले आहे.

मकर संक्रांत हा महिलांचा सण असल्याकारणाने प्रत्येक महिला गरीब असो वा श्रीमंत साडी खरेदी करतेच. त्यामुळे ह्या महिलांनी साडी हा विषय डोळ्यासमोर घेऊन ज्या महिला दररोज शहरातील घाणकचरा साफ करतात अशा महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासाठी मकर संक्रांतीच्या सणाला तिळगुळ देऊन व फुल साडी देऊन अशा साफसफाई करणाऱ्या महिला आहे त्यांचा सत्कार केला आहे. या महिला दररोज सफाईचे काम करतात त्यामुळेच आपले शहर सुंदर व सुशोभित आपल्याला बघण्यास मिळते अशा महिलांचाही सत्कार होणे फार गरजेचे असते त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व महिलांना हळदीकुंकू व तिळगुळ देण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी नगरपरिषद सिंदखेडराजा उपनगराध्यक्ष सौ दिपाली योगेश म्हस्के उपस्थित होत्या. तसेच शिवशक्ती नगर मधील सर्व महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!