गाव रस्तागावाचा रस्ताग्रामीण रुग्णालयमहाराष्ट्रशेत रस्तेहवे रोड

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सीमावर्ती भागातील गेल्या दहा वर्षांपासून

प्रलंबित असलेल्या हिवरखेड–चिचारी–धोंडा आखर रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळाली

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सीमावर्ती भागातील गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हिवरखेड–चिचारी–धोंडा आखर रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळाली

     राजेश पाटील खारोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

असून, सदर रस्त्याचे बांधकाम सध्या वेगाने प्रगतीपथावर आहे.

चिचारी ते हिवरखेड रेल्वे स्टेशन पट्ट्यात अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू असून, संबंधित यंत्रणा व कंत्राटदार यांच्याकडून कामाची गती समाधानकारक असल्याचे चित्र आहे. अनेक वर्षे रखडलेल्या या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता.

या रस्त्यामुळे तेल्हारा तालुक्यातील चिचारी, धोंडा आखर, हिवरखेड तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांना सुरक्षित व सुलभ दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. शेतकरी वर्गासाठी शेतीमाल वाहतूक सुलभ होणार असून, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि नागरिकांना दैनंदिन कामांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

विशेषतः आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आतापर्यंत खराब रस्त्यामुळे आजारी रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवणे कठीण जात होते; मात्र हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर रुग्णवाहिका व खासगी वाहनांची ये-जा सुलभ होऊन अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.

दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला मार्गी लावल्याबद्दल परिसरातील शेतकरी, आदिवासी नागरिक व ग्रामस्थांनी शासन, प्रशासन आणि संबंधित विभागांचे जाहीर अभिनंदन केले आहे. विकासाची ही प्रक्रिया अशीच सातत्याने सुरू राहावी व उर्वरित पायाभूत सुविधा देखील तातडीने पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!