महाराजमहाराष्ट्रवाशिमविदर्भसरकारी योजनासांप्रदायिक

भाविकांच्या सोयीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे जलसंधारण मंत्री संजय राठोड

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे येत्या १५ फेब्रुवारी रोजी होणारा श्री संत सेवालाल महाराज जन्मोत्सव हा

भाविकांच्या सोयीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे जलसंधारण मंत्री संजय राठोड

     वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे येत्या १५ फेब्रुवारी रोजी होणारा श्री संत सेवालाल महाराज जन्मोत्सव हा लाखो भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असून, उत्सव काळात कोणत्याही भाविकाला गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि वेळेवर काम करावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांनी दिले.

जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोहरादेवी येथील नंगारा भवनात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस विधान परिषद सदस्य महंत बाबूसिंग महाराज, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम जोशी, महंत कबीरदास महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज तसेच विश्वस्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

मंत्री राठोड यांनी कार्यक्रमस्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून सुविधा, नियोजन आणि व्यवस्थापनाची सविस्तर माहिती घेतली. “दरवर्षी जन्मोत्सव तीन दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो; मात्र यावर्षी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे हा उत्सव साधेपणाने व एकाच दिवसापुरता साजरा करण्यात येणार आहे,” असे ते म्हणाले. धार्मिक शिस्त आणि शांततेत कार्यक्रम पार पडावा यावर त्यांनी भर दिला.

बैठकीत पाणीपुरवठा, वीजपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता व्यवस्था, वाहतूक व पार्किंग नियोजन, गर्दी नियंत्रण, आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन सेवांचे नियोजन यावर तपशीलवार चर्चा झाली. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत ठेवावी, असे निर्देश देण्यात आले.

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले की, “जन्मोत्सवासाठी आवश्यक सर्व कामांची पाहणी पूर्ण झाली असून संबंधित यंत्रणांमध्ये योग्य समन्वय साधून वेळबद्ध नियोजन करण्यात येत आहे.”

दरम्यान जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. बैठकीला काही अधिकारी दुरदृश्यप्रणालीद्वारेही सहभागी झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!