टॉप न्यूज़देशबुलढाणामहाराष्ट्रयुवाविदर्भसामाजिक कार्यकर्तेसिंदखेड राजास्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट

पळसखेड चक्क्यात ‘हर घर तिरंगा’चा उत्साह; सुभाष मुंडेंचा अनोखा उपक्रम

स्वातंत्र्यदिनानिमित्त पळसखेड चक्का येथे ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.

पळसखेड चक्क्यात ‘हर घर तिरंगा’चा उत्साह; सुभाष मुंडेंचा अनोखा उपक्रम

           विशेष प्रतिनिधी सिंदखेडराजा

पळसखेड चक्का, ता. सिंदखेड राजा : स्वातंत्र्यदिनानिमित्त पळसखेड चक्का येथे ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले

ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासक तथा सरपंच शिवानंद मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष देवानंद विष्णू सोसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून तलाठी आर. बी. जाधव उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुभाष नागोराव मुंडे यांनी ‘हर घर तिरंगा’चा संदेश देत गावातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकावा, या उद्देशाने प्रत्येक नागरिकाला तिरंगा ध्वज मोफत उपलब्ध करून दिला. त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करून जिल्हा परिषद शाळेत त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच शिवानंद मुंडे व शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष देवानंद विष्णू सोसे यांच्या हस्ते सुभाष मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला गावातील महिला मंडळ, नागरिक, युवक, विद्यार्थी तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आसाराम मुंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे यांचीही विशेष उपस्थिती होती.

‘हर घर तिरंगा’च्या माध्यमातून देशभक्तीची भावना जागृत करत पळसखेड चक्का ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!