क्राइमपोलीसवन विभागवृक्षवृक्षप्रेमीशेत रस्तेशेतकरीशेतीशेती न्यूज

मंगरुळपीर तालुक्यात अवैध रूक्ष तोड चोर करतो चोरी फीरते पथकातील अधिकारी भ्रष्टाचारी, मरतोय मात्र शेतकरी

बहुचर्चित खैर चोरी प्रकरणात शेतकऱ्यावरच प्राथमिक गुन्हे अहवाल का

मंगरुळपीर तालुक्यात अवैध रूक्ष तोड चोर करतो चोरी फीरते पथकातील अधिकारी भ्रष्टाचारी, मरतोय मात्र शेतकरी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे

बहुचर्चित खैर चोरी प्रकरणात शेतकऱ्यावरच प्राथमिक गुन्हे अहवाल का ?

मंगरूळपीर तालुक्यातील जुनापाणी शेतशिवारात दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी घडलेले बहुचर्चित खैर वृक्षतोड व तस्करी प्रकरण हे केवळ अवैध वृक्षतोडीचे नसून, वनविभागातील फीरते पथकातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे भयावह वास्तव उघड करणारे प्रकरण ठरत आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात खऱ्या आरोपींवर कारवाई करण्याऐवजी निर्दोष शेतकऱ्यावर प्राथमिक गुन्हे अहवाल (PIR) दाखल करून गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. जुनापाणी परिसरातील शेतशिवारात बहुमूल्य खैर प्रजातींची मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. या वृक्षांपासून तयार होणाऱ्या ‘कात’ निर्मिती होते त्यामुळे खैर च्या लाकडाला कळ्या बाजारात प्रचंड मागणी असल्याने खैर लाकूड तस्करी हा मोठा आर्थिक गुन्हा मानला जातो. या प्रकरणात खैर लाकडाने भरलेले एक वाहन पकडण्यात आले असताना, संबंधित वाहन फीरते पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने सोडून देण्यात आले, अशी धक्कादायक माहिती समोर आली. विशेष म्हणजे, सदर वाहन सोडण्यासाठी तब्बल १ लाख २० हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार (लाच) झाला होता. या गैर कृत्याबद्दल मुख्य वनसंरक्षक, यवतमाळ यांच्याकडे हा महाप्रतापी महापराक्रम हा फिरते पथकाने घडवून आणला याचे सबळ पुरावे असलेल्याचे लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. या निवेदनाची तात्काळ दखल घेत मुख्य वनसंरक्षक यांच्या आदेशाने दि. २०/१२/२०२५ रोजी उपविभागीय वनाधिकारी हे त्यांच्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी करण्यात आलेल्या पाहणी व पंचनाम्यात एकूण ११६ खैर जातीचे वृक्ष तोडले गेल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड ही स्थानिक शेतकऱ्याच्या क्षमते बाहेरील असून, यामागे वृक्षतोड करणारी सुसंघटित टोळी व अधिकाऱ्यांचे संरक्षण असल्याशिवाय हे शक्यच नाही, असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. असे असताना, या संपूर्ण प्रकरणात प्रत्यक्ष वृक्षतोड करणारे, वाहनातून लाकूड वाहतूक करणारे व लाच घेऊन वाहन सोडणारे अधिकारी मोकाट, तर ज्या शेतकऱ्याच्या शेतातून झाडे तोडली गेली त्याच्यावर प्राथमिक गुन्हे अहवाल (PIR) दाखल करण्यात आला. हा प्रकार म्हणजे “चोर करतो चोरी, फिर ते पथकच भ्रष्टाचारी, मरतोय मात्र शेतकरी” अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या प्रकरणामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी गरीब शेतकऱ्याला बळीचा बकरा बनविले जात असल्याचा आरोप जोर धरू लागला आहे. जर या प्रकरणाची निष्पक्ष, स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी झाली नाही, तर भविष्यात खैरसारख्या दुर्मिळ वृक्षांची कत्तल रोखणे अशक्य ठरेल आणि पर्यावरणासह शेतकऱ्यांचे आयुष्यही उद्ध्वस्त होईल, असा इशाराही सामाजिक कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहे. आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की, खऱ्या आरोपींवर कारवाई होणार की पुन्हा एकदा शेतकरीच न्यायव्यवस्थेचा बळी ठरणार?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!