छत्रपती शिवाजी महाराजजय जिजाऊजयंतीबुलढाणामहाराष्ट्रमहिलाविदर्भसावित्रीबाई फुलेसिंदखेड राजा

सिंदखेडराजात जिजाऊ भक्तांचा जनसागर… 428 व्या जन्मोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद!”

आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सिंदखेडराजाकडे लागले असून, राजमाता जिजाऊंच्या 428 व्या जयंतीनिमित्त

“सिंदखेडराजात जिजाऊ भक्तांचा जनसागर… 428 व्या जन्मोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद!”

                सिंदखेडराजा | विशेष प्रतिनिधी

आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सिंदखेडराजाकडे लागले असून, राजमाता जिजाऊंच्या 428 व्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा येथे जिजाऊ भक्तांचा अक्षरशः जनसागर उसळला आहे.

देशाच्या विविध भागांतून लाखो जिजाऊ भक्त सिंदखेडराजात दाखल झाले असून, राजमाता जिजाऊंच्या चरणी अभिवादन करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

या पवित्र सोहळ्यास केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील हे देखील उपस्थित होते. त्यांनी राजमाता जिजाऊंना अभिवादन करून भाविकांशी संवाद साधला.

यावेळी पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी महत्त्वपूर्ण आश्वासन देताना सांगितले की,

“पुढील वर्षी सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या पूजन व दर्शनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते येण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल,” असे आश्वासन त्यांनी उपस्थित जिजाऊ भक्तांना दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित भाविकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होताना दिसून आली.

दरम्यान, राजे लखुजीराव जाधव यांचा ऐतिहासिक राजवाडा आकर्षक रोषणाईने सजवण्यात आला असून संपूर्ण परिसर भक्तिमय व उत्सवी वातावरणात न्हाऊन निघाला आहे. तसेच जाधव घराण्याचे 13 वे वंशज राजे शिवाजी जाधव यांनी विधिवत पूजा करून राजमाता जिजाऊंना अभिवादन केले.

या सोहळ्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बुलढाणा जिल्हाप्रमुख जालिंदरजी बुधवत हे सुद्धा उपस्थित होते. शेतकरी न्यूज शी बोलताना त्यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला.

ते म्हणाले की,

“सिंदखेडराजा जिजाऊ नगरीच्या सर्वांगीण विकासासाठीचा विकास आराखडा पुढील वर्षभरात राज्य सरकारने मंजूर केला नाही, तर येणाऱ्या पुढील वर्षी पालकमंत्र्याला सिंदखेडराजामध्ये पाय ठेवू देणार नाही,” असा कडक इशारा त्यांनी यावेळी दिला.

राजमाता जिजाऊंचा हा जन्मोत्सव केवळ एक धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम नसून, मातृत्व, राष्ट्रभक्ती, संस्कार, त्याग आणि स्वराज्याची प्रेरणा देणारा ऐतिहासिक व प्रेरणादायी सोहळा असल्याची भावना यावेळी सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!